Kaun Banega Crocpati 13 : जेठालाल आणि बापूजी हॉट सीटवर, अमिताभ बच्चन विचारतात, "बापूजी दाट देते है क्या आपको?"

मालिका-ए-रोज
Updated Dec 05, 2021 | 14:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tarak Mehata team in KBC 13 : केबीसी 13चा शुक्रवार हा नेहमीच खास असतो, यावेळीही तो खासच आहे. कारण, लवकरच जेठालाल आणि बापूजींना हॉटसीटवर पाहता येणार आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या कलाकारांनी नुकतीच केबीसीच्या मंचावर हजेरी लावली.

Tarak Mehata ka ulta chasma team in KBC 13
केबीसीमध्ये तारक मेहेता का उल्टा चष्माची टीम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केबीसी 13 च्या मंचावर जेठालाल आणि बापूजींची धमाल
  • बापूजी आणि जेठालाल हॉट सीटवर
  • धमाल, मस्ती, आणि बरंच काही

Jethlal and Bapuji in KBC 13: कौन बनेगा करोडपती 13 (KBC 13) मधील शुक्रवारच्या आगामी भागात, तारक मेहता का उल्टा चष्मा 
या टेलिव्हिजन कार्यक्रमातील खास पाहुणे बघायला मिळतील. जेठालाल (Dilip Joshi) आणि बापूजी (Amit bhat) हॉट सीटवर पाहायला मिळतील
आणि अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसणार आहेत. आता जेठालाल आणि बापूजी आहेत म्हटल्यावर सेटवर एकच धमाल पाहायला मिळाली. 

जेठालाल अमिताभ बच्चन यांना विचारताना दिसत आहेत की ते त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनवर ओरडतात का? ज्यावर, बिग बींनी उत्तर दिलंय की तो लहान असताना त्याच्यावर ओरडायचा पण आता तो मोठा झाला आहे, त्यामुळे त्याच्यावर ओरडत नाहीत.  जेठालाल पुढे बिग बींना म्हणतात की, ओरडण्यापेक्षा तुम्ही त्याला समजून सांगत असाल, होय ना? असं जेठालाल म्हणताच बापूजी त्याच्याकडे रागाने बघतात.


पुढच्याच मिनिटाला, अमिताभ बच्चन जेठालालला विचारताना दिसतो, "क्यूं, बापू जू दाट ते हैं क्या आपको?" यावर जेठालाल काहीच उत्तर देत नाही, मात्र, त्याचा चेहरा सर्व काही सांगून जातो, जेव्हा बापूजी त्याच्यावर ओरडले तेव्हाचा फ्लॅशबॅक स्क्रीनवर प्रेक्षकांनापाहायला मिळतो. 

या शोच्या निर्मात्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि कॅप्शन दिले, "सवाल और जबाब के बीच होंगे क्या सारे मस्ती भरे पल और अनोखे किस्से, जब #KBC के मंच पर आएगी #TaarakMehtaKaOoltah #Chashmah dekhonganekie team! ka #ShaandaarShukravaar episode, iss शुक्रावर 10 डिसेंबर, रात 9 बाजे, sirf Sony par. (sic)"

तारक मेहता का उल्टा चष्मामधील बबिता जी, डॉ. हाथी, सोधी आणि इतर अनेक कलाकार प्रेक्षकांमध्ये बसलेले दिसतात. जेव्हा बिग बी जेठालालला त्याचे वडील ओरडतात का असे विचारतात तेव्हा ते सर्व मोठ्याने हसतात

गोकुळधामवासियांच्या उपस्थितीमुळे मनोरंजनात भर घालणारा हा भाग नक्कीच एक मेजवानी असेल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी