रिक्षातून प्रवास करणारे जेठालाल आहेत तब्बल ८० लाखांच्या ऑडी क्यू7चे मालक

मालिका-ए-रोज
Updated Apr 29, 2021 | 17:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

पडद्यावर नेहमी रिक्षातून प्रवास करणारे जेठालाल उर्फ दिलीप जोशी खऱ्या आयुष्यात लक्झरी गाड्यांचे शौकीन आहेत. त्यांच्याकडे महागड्या कारचे कलेक्शन आहे. यात ऑडी क्यू७चाही समावेश आहे. याी किंमत तब्बल ८० लाख रूपये आहे

dilip joshi
रिक्षातून प्रवास करणारे जेठालालकडे तब्बल इतक्या लाखांची गाडी 

थोडं पण कामाचं

  • जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांनी १९८९मध्ये बॉलिवूडमधून या दुनियेत पाऊल ठेवले होते. 
  • १९९५मध्ये दिलीप जोशी हे टीव्ही जगतात आले
  • दिलीप जोशी अभिनयासह सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असतात. 

Tarak Mehta Ka Ulta Chashma Jethalal Aka Dilip Joshi Car Collection: टेलिव्हिजन जगतात आपली स्वत:ची मोठी ओळख निर्माण केलेले जेठालाल उर्फ दिलीप जोशी(dilip joshi) यांना कोण ओळखत नाही. तारक मेहता याशोमधून तर ते प्रत्येक घरात पोहोचले आहेत. सब चॅनेवरील ही मालिका लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतची आवडीची आहे. शोबाबत बोलायचे झाल्यास बबिता जी आणि जेठालाल यांच्या मैत्रीचे किस्से तर साऱ्यांनाच माहिती आहेत. (Tarak Mehta fame dilip joshi car collection are luxirious)

जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांनी वयाच्या १२व्या वर्षापासून अभिनयाला सुरूवात केली. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची खूप आवड होती. मात्र इतका मोठा पल्ला गाठणे सोपे नव्हते. आपल्या कठोर मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर त्यांनी हे स्थान मिळवले आहे. जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांना गाड्यांची खूप आवड आहे. ते २५ दिवसांच्या शूटिंगसाठी ३६ लाख रूपये घेतात. जाणून घ्या जेठालाल यांच्या लक्झरी लाईफबद्दल आणि कारबद्दल. 

दिलीप ते जेठालालचा प्रवास

१९८९मध्ये पृथ्वी थिएटरमधून त्यांनी भाग्याश्रीसोबत रामूच्या नावाच्या कॅरेक्टरने आपल्या अभिनयाला सुरूवात केली. यानंतर हम आपके है कौन, फिर भी दिल है हिंदुस्तानी, हमराज,दिल है तुम्हारा सारख्या सिनेमांमध्ये काम केले. मात्र त्यांना तितकीशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. यानंतर दिलीप जोशी यांननी १९९५मध्ये टीव्ही जगतात प्रवेश केला. दाल में काला, कोरा कागज, हम सब एक है, आज की श्रीमती आणि हम सब बाराती या मालिकांमधून लोकांच्या मनात जागा मिवली. 

मात्र २००८मध्ये सब चॅनेलवरील तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेने दिलीप जोशी यांना टीव्ही जगात जेठालाल म्हणून एक नवी ओळख मिळवून दिली आणि प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. १३ वर्षानंतरही हा शो आपल्या टीआरपी रेटिंगवरील नंबर वन शो आहे. जेठालाल खऱ्या आयुष्यात बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणे लक्झरी लाईफ जगतात. ते कारचे खूप शौकीन आहेत. 

महागड्या गाड्यांचे कलेक्शन

ऑनस्क्रीनवर नेहमी रिक्षाने प्रवास करणारे जेठालाल महागड्या गाड्यांचे शौकीन आहेत. त्यांच्याकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. यात ऑडी क्यू७ ही त्याची आवडती कार आहे. याची किंमत तब्बल ८० लाख रूपये आहे. याशिवाय त्यांना टोयोटा इनोव्हा एमपीव्ही गाडी चालवणेही खूप आवडते. याची किंमत १४ लाख रूपये आहे. 

सोशल मीडियावरही आहेत सक्रिय

अभिनयाच्या दुनियेसह दिलीप जोशी नेहमी सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असतात. दिलीप यांनी नुकतेच २०२०मध्ये इन्स्टाग्राम जॉईन केले. येथे ते नेहमी आपले फोटो पोस्ट करत असतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी