Jethalal Missing DayaBen: तारक मेहता का उल्टा चश्मा ही टीव्हीवरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. टीआरपीच्या बाबतीत पण ही मालिका नेहमीचं पुढे असते. वास्तविक या मालिकेचे सगळे जुने कलाकार सोडून गेले आहेत. या शोची खास ओळख असलेली दयाबेनही मालिका सोडून गेली आहे. तब्बल 5 वर्षांनंतरही निर्माते दूसरी दयाबेन शोधू शकले नाहीत. अशातच, शो मधील नवीन टप्पूच्या आगमनाची घोषणा करण्यासाठी निर्मात्यांनी कॅान्फरन्स आयोजित केली होती. यात जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी सुध्दा उपस्थित होते त्यावेळी त्यांनी दयाबेनविषयी भाष्य केले.
तेव्हा त्यांना विचारण्यात आले, की दयाबेन शोमध्ये परत कधी बघायला मिळणार? तेन्हा ते म्हणाले, हा पूर्णपणे निर्मात्यांचा प्रश्न आहे. शोचे निर्मातेच ठरवतील की त्यांना नवीन कलाकार घ्यायचा की नाही. पुढे ते म्हणाले होय, मला सांगायचे आहे की एक कलाकार म्हणून मला दया या व्यक्तिरेखेची खूप आठवण येते. मला माहित आहे की तुम्ही सर्वांनी दया आणि जेठाच्या कॉमिक सीन्सचा खूप दिवसांपासून आनंद घेतला आहे. जेव्हापासून दिशाजी गेली आहे तेव्हापासून आमच्या मालिकेतील फनी पार्ट हरवला आहे. यावर लोकांचही तेच म्हणणं आहे.
मालिकेत टप्पूचे पात्र राज अनादकट साकारत होता. आता मात्र त्यानेही शोचा निरोप घेतला आहे. त्याजागी आता नितीश भुलानी हे पात्र साकारणार आहे. एका मुलाखतीत त्याने सांगितले की, तो दिलीप जोशींसोबत काम करण्यात खूप उत्सुक आहे. यासोबतच नितीश म्हणाले- दिलीपजींना त्यांच्या भूमिकेत कसे जगायचे हे माहित आहे.