Tejashree pradhan and nivedita saraf Reunion : आसावरी राजे आणि शुभ्रा पुन्हा एकदा एकत्र दिसल्या. निमित्त होतं फक्कड मेजवानीचं. एका सासूने आपल्या लाडक्या सुनेला दिलेली हा खास मेजवानी. स्मॉल स्क्रीनवरील 'अग्गबाई सासूबाई' ( Aggabai Sasubai ) या मालिकेत निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आणि
तेजश्री प्रधान (Tejashri pradhan) यांनी सासू-सुनेची भूमिका साकारली होती. या सासू-सुनेच्या जोडीने अल्पावधीतच प्रेक्षकांना आपलंस केलं होतं. ( Tejashri pradhan and Nivedita saraf Reunion spend quality time together photo shared on social media )
या दोघीही सोशल मीडियावर खूप अँक्टिव्ह असतात. आपले अपडेट्स या दोघी पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असतात. नुकताच तेजश्री प्रधानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्याचं कारणही तसंच खास आहे.
अधिक वाचा : 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीचं राहुल द्रविडसोबत आहे खास नातं
फोटोत निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आणि तेजश्री प्रधान (Tejashri pradhan) एकत्र असल्याचं दिसत आहे. या दोघींना पुन्हा एकत्र पाहून चाहत्यांना खूप आनंद झालेला आहे. तेजश्री प्रधानने नुकतीच निवेदिता सराफ यांना भेटली. दोघींनी एकमेकींसोबत खूप छान वेळ घालवला. विशेष म्हणजे यावेळी आसावरी अर्थातच निवेदिता सराफ यांनी शुभ्रा म्हणजेच तेजश्रीसाठी काही खास पदार्थांचा बेत केला होता. हा फोटो शेअर करत निवेदिता सराफ यांच्या स्वयंपाकाचं कौतुक करायलाही तेजश्री विसरली नाही.
अधिक वाचा : 'ही' प्रसिद्ध मालिका 'या' दिवशी होणार Off Air?
मराठी स्मॉल स्क्रीनवर नेहमीच वैविध्यपूर्ण विषय मालिकांमधून हाताळले जातात. 'अग्गबाई सासूबाई' ( Aggabai Sasubai ) ही अशीच एक मालिका. नेहमी सुनेला त्रास देणारी, तिचा छळ करणाऱ्या सासूपेक्षा निवेदिता सराफ यांनी रंगवलेली सासू वेगळी होती. तर सासूला प्रोत्साहन देणारी, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करणाऱ्या सूनेची भूमिका तेजश्री प्रधानने वठवली होती. त्यामुळे या दोघींची केमिस्ट्री (Tejashri and Nivedita's chemistry )अफलातून होती. ही मालिका संपून आता बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही प्रेक्षक या सासू-सुनेच्या जोडीला खूप मिस करतात. या मालिकेने सासू-सुनेच्या नात्याचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर मांडला होता.