Zee marathi mahaepisode : झी मराठीवर आज रंगणार मालिकांचे महाएपिसोड, प्रेक्षकांना मिळणार मेजवानी

मालिका-ए-रोज
Updated Jan 09, 2022 | 15:55 IST | टाइम्स नाऊ मराठी

Zee marathi mahaepisode :झी मराठी वाहिनीवर आज प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड रंगणार आहेत. मन उडू उडू झालं, किचन कल्लाकार, देवमाणूस आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकांचे महाएपिसोड रंगणार आहेत.

Zee marathi mahaepisode
मालिकांचे महाएपिसोड, प्रेक्षकांना मेजवानी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मन उडू उडू झालं या मालिकेत दीपू आणि इंद्राचे नाते आता काय वळण घेणार?
  • आदिती कोणाची निवड करणार? सिडच्या स्वप्नांची की देशमुखांच्या कुटुंबाची?
  • डॉ. अजित कुमारच्या जाळ्यात अडकले नवे सावज, काय असेल नवा प्लान?

Zee marathi mahaepisode : झी मराठी वाहिनीवर आज प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांचे महाएपिसोड रंगणार आहेत. मन उडू उडू झालं, किचन कल्लाकार, देवमाणूस आणि तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकांचे महाएपिसोड रंगणार आहेत. मन उडू उडू झालं या मालिकेत इंद्राने दिपूसमोर त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, वडिलांना दिलेल्या वचनामुळे दिपू इंद्रापासून स्वत:ला लांब ठेवत आहे. तर दुसरीकडे, आपलंही इंद्रावर तितकच प्रेम असल्याचं दिपूला आता जाणवू लागलं आहे.  मात्र, दिपू इंद्राला होकार देईल का? दिपू आणि इंद्राची ही लव्हस्टोरी काय वळण घेणार याचीच उत्सुकता आहे. संध्याकाळी 7 वाजता या मालिकेचा विशेष भाग रंगणार आहे. 

तर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सिड अमेरिकेला जाण्याबाबत त्याचं मत आदितीला सांगणार आहे. ते ऐकून आदिती अस्वस्थ होते. त्यामुळे आता निर्णय घेण्याची वेळ आदितीवर आलेली आहे. आदिती देशमुख कुटुंबाची निवड करणार की सिद्धार्थच्या अमेरिकेला जाण्याच्या त्याच्या स्वप्नात साथ देणार? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेचा महाएपिसोड. 

किचन कल्लाकारच्या विशेष भागात प्रेक्षकांना सलील कुलकर्णी, मुग्धा वैशंपायन आणि वैशाली म्हाडे यांची किचनमधील तारेवरची कसरत पाहायला मिळणार आहे. 

देवमाणूस ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत आहे. पुन्हा एकदा डॉक्टर अजित कुमारला एक नवीन सावज मिळालं आहे. गावात आलेल्या कॉन्ट्रॅक्टरची 
बायको नीलमला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न डॉक्टर करत आहे. अजित नीलमला वाड्यात घेऊन येतो. डिंपला त्याच्यावर नजर ठेवून आहे. वाड्यातील सर्व जण नीलमच्या खातिरदारीत व्यस्त असताना ती संधी साधून अजित डिंपल जवळचा पुरावा नष्ट करतो. मात्र, डिम्पलला खात्री आहे कि नटवरने सलोनीचा खून केला आहे. त्यामुळे ती त्याचा पाठपुरावा करतेय. आता डिम्पल हे सिद्ध करू शकेल का? की नटवरच खूनी आहे. 

हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका देवमाणूस 2 चा एक तासाचा विशेष भाग तेव्हा आता या मालिकांमध्ये काय ट्विस्ट अँड टर्न येणार हे लवकरच कळेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी