The Kapil Sharma Show : "कॉमेडी का नया सीझन.."'द कपिल शर्मा '10 सप्टेंबरपासून स्मॉल स्क्रीनवर दाखल होणार

मालिका-ए-रोज
Updated Aug 26, 2022 | 14:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

The Kapil Sharma show : द कपिल शर्मा शो'( The Kapil Sharma show) ची प्रेक्षकांमध्ये असलेली क्रेझ अजूनही कायम आहे. कपिल शर्माची कॉमेडी स्टाइल (Comedy style), त्याचं कॉमेडी टायमिंग (Comedy timing) प्रेक्षकांना आजही आवडते. असा हा 'द कपिल शर्मा शो' ( The Kapil Sharma show) चा नवा सीझन 10 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या नव्या सीझनचा प्रोमो रिलीज करण्यात आला.

The Kapil Sharma show starting from 10 september
10 सप्टेंबरपासून मिळणार हास्याचा डबल डोस  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'द कपिल शर्मा'शोच्या नव्या सीझनची उत्सुकता
  • 10 सप्टेंबरपासून नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार
  • नव्या सीझनमध्ये नव्या कलाकारांना संधी देण्यात आलेली आहे.

The Kapil Sharma show : स्मॉल स्क्रीनवरी एक गाजलेला, प्रेक्षकांचा आवडता असा कॉमेडी शो म्हणजेच 'द कपिल शर्मा शो' ( The Kapil Sharma show). कपिल शर्माच्या (Kapil Sharma ) या कॉमेडी शोच्या नव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. आता या शोबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. या कॉमेडी शोचा नवा सीझन (New season ) येत्या 10 सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच या शोचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला. ( The Kapil Sharma show starting from 10 september do watch promo release)

सोनी टीव्हीने ट्विटरवर प्रोमो शेअर केला

सोनी टीव्हीने नव्या सीझनचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत नव्या सीझनच्या प्रीमियरबद्दलही माहिती देण्यात आली आहे. सोनी टीव्हीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले की, 'हास्याचा नवा डोस, कपिल शर्मा कॉमेडीचा नवा सीझन घेऊन येत आहे. पाहा 'द कपिल शर्मा शो' 10 सप्टेंबरपासून शनिवार-रविवार रात्री 9:30 वाजता फक्त सोनीवर. विशेष म्हणजे या नव्या सीझनमधील कलाकारांची झलकही प्रोमोमध्ये दिसत आहे. 

अधिक वाचा : ब्लॅकमेलिंगचा बळी ठरल्या सोनाली फोगाट

प्रोमोमध्ये काय खास आहे?

शोच्या नव्या सीझनचा प्रोमो धमाकेदार आहे. प्रोमोमध्ये कपिल हॉस्पिटलमध्ये दाखल असलेला दिसत आहे. त्याच्या डोक्यावर पट्टी बांधल्याचे दिसत आहे. कपिल शोमधील सर्व पात्रांना एक एक करून ओळखतो, मात्र त्याची पत्नी अर्थातच सुमोना चकवर्तीला ओळखत नाही. तेवढ्यात एक मुलगी कपिलला मिठी मारायला येते आणि त्याचवेळी अर्चना पुरणसिंगची प्रोमोमध्ये एन्ट्री होते. एकूणंच हॉस्पिटलमध्ये असूनही हसवणं हाच आपला धर्म असल्याचं या सीझनचे कलाकार सांगतायेत असं म्हणायला हरकत नाही. 

अधिक वाचा :  Pushpa-2 बाबत मोठी अपडेट आली समोर, जाणून घ्या नेमकी बातमी

नव्या सीझनमध्ये कलाकारांची मांदियाळी

'द कपिल शर्मा शो'च्या टीममध्ये काही बदल करण्यात आले आहेत. कराराच्या मुद्द्यांमुळे कृष्णा अभिषेकला नव्या सीझनमधून डच्चू देण्यात आला आहे.कॉमेडियन भारती सिंगदेखील नव्या सीझनमध्ये दिसणार नाही. अर्थात त्याचं कारणही तसंच आहे. भारती नुकतीच आई झालेली आहे. त्यामुळे हा ब्रेक तिने घेतला असल्याचं म्हटलं जातंय. 
प्रोमोमध्ये किकू ,शारदा, सुमोना, चंदर प्रभाकर, अर्चना पूरण सिंग तसेच सृष्टी रोडे, इश्तियाक, सिद्धार्थ सागर, मस्की श्रीकांत, गौरव दुबे यांसारख्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. 

अधिक वाचा : कावेरी-राजची गुहागरमध्ये रोमॅण्टिक सायकल राईड

नव्या सीझनचा पहिला गेस्ट असेल अभिनेता अक्षय कुमार

'द कपिल शर्मा'शो च्या नव्या सीझनमध्ये कपिलची भंबेरी उडवायला गेस्ट म्हणून येणार आहे अभिनेता अक्षय कुमार. पिंकविलाने दिलेल्या सूत्रानुसार, अक्षय कुमार त्याच्या आगामी 'कटपुतली' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार आहे. अक्षयचा कटपुतली हा सिनेमा येत्या 2 सप्टेंबरला डिस्ने+ हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. 

'द कपिल शर्मा शो' हा स्मॉल स्क्रीनवरील सर्वात चर्चिला जाणारा कॉमेडी शो आहे.या शोमध्ये दर आठवड्याला बॉलिवूड सेलिब्रिटी येतात. बॉलिवूड सिनेमांच्याप्रमोशनसाठी हक्काचं व्यासपीठ असंही कधी-कधी हे सेलिब्रिटी म्हणतात. या कॉमेडी शोचा पहिला सीझन 23 एप्रिल 2016 रोजी रिलीज झाला. या शोला IMDb वर 7.3 रेटिंग मिळाले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी