Devmanus is back : देवमाणूसचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला, पहिल्याच भागाने प्रेक्षकांना टाकलं कोड्यात

मालिका-ए-रोज
Updated Dec 20, 2021 | 12:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

Devmanus is back : देवमाणूस -2 चा पहिला भाग हा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ठरला. अगदी शेवट पर्यंत रहस्य ठेवणाऱ्या या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमधील पहिल्या भागातच प्रेक्षकांना कोड्यात टाकले आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्न पडलेत. पहिल्या भागाने नव्या सीझनबद्दलही उत्सुकता निर्माण केली आहे.

Devmanus is back to meet the audience
देवमाणूस-2 चाा पहिला भाग, प्रेक्षकांना पडले अनेक प्रश्न  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • देवमाणूसचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला, अनेक प्रश्नांनी उठलं मनात काहूर
  • उत्कंठावर्धक होता देवमाणूस-2चा महाआरंभ
  • अनेक प्रश्नांनी प्रेक्षकांना टाकलं कोड्यात


Devmanus-2, New season : झी मराठी (Zee Marathi ) वरील प्रचंड लोकप्रिय आणि वादग्रस्त अशी मालिका म्हणजे देवमाणूस (Devmanus). या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तसेच या मालिकेवर (Serial) टीकाही बरीच झाली. मात्र, मालिकेची अफाट लोकप्रियता पाहून वाहिनीने देवमाणूसचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आणला.  रविवारी,  देवमाणूस-2 चा महाआरंभ झाला असून सुरुवातीच्या भागातचं मालिकेनं प्रेक्षकांना विचारात पाडलं आहे. पहिल्याच भागाने प्रेक्षकांच्या मनात अनेक  प्रश्न निर्माण केली आहेत.

अगदी शेवटपर्यंत रहस्य ठेवणाऱ्या या मालिकेच्या दुसऱ्या सीझनमधील पहिल्या भागातच प्रेक्षकांना कोड्यात टाकले आहे. प्रेक्षकांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलं आहे. डॉ. अजित कुमारची एन्ट्रीचं भन्नाट होती. राजस्थानी व्यक्तिरेखेच्या रुपात अजित कुमारचं दर्शन प्रेक्षकांना झालं. या नव्या रुपातील अजित कुमारला आगीपासून भीती वाटते, त्याला काही लोकांची आठवण येते, त्याला काही विचित्र स्वप्न पडतात. त्यावेळी एक वैद्य अजित कुमारच्या बायकोला सांगतो ह्याला मागील जन्मातील व्यक्ती, घटना आठवतात आहेत. तेव्हा तू त्याला त्याच गावात घेऊन जा.

त्या वैद्याच्या सांगण्यानुसार, ते दोघेही पुन्हा एकदा डिंपलच्या गावात येतात, तिथे गावात डॉ. अजित कुमार यांच्या पुण्यस्मरणात उभारण्यात आलेल्या  देवमाणसाच्या पुतळ्यासमोर ते उभे राहतात. त्याचवेळी डिंपल त्यांना भेटते. तुम्हाला कोण हवं आहे? असं विचारताच डिंपलला नव्या रुपातील अजित कुमार सांगतो, मला देवमाणूस हवा आहे. मला त्याला भेटायचं आहे. अजित कुमारचं हे वाक्य ऐकून डिंपल खूप घाबरते आणि तिथून पळ काढते. आता या नवीन पात्रला देवमाणसाला भेटायचं आहे, मग नक्की हा कोण आहे? डॉ. अजित कुमारचा पुनर्जन्म झाला आहे का? की अजित कुमारचा मृत्यूच झाला नव्हता? नव्या रुपात, नव्या रुपात अजित कुमार सगळ्याचा बदला घेतोय का? असे अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होतात. 

राजस्थानमधील एक छोटा जादूगार हा नवा अजित कुमार दाखवण्यात आला आहे. तिथे पर्यटनासाठी येणाऱ्यांना हा आपली जादू दाखवतो. एका परदेशी महिलेला ही जादू शिकायची असते, मात्र, हा नाही म्हणतो. आणि दुसऱ्याच दिवशी या महिलेचा खून होतो. आता नक्की हे काय प्रकरण आहे? हा खरचं अजित कुमारच आहे का?  पहिल्या भागात आगीत सापडलेला डॉ. अजितकुमार राजस्थानच्या जैसलमेर गावात कसा पोहचला?  अशा नानाविध प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये उलगडत जातील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी