बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तयार झाला तिसरा गट- “C” गृप

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी “जिंकू किंवा लढू” हे या आठवड्याचे साप्ताहिक कार्य असेल असे जाहीर केले.

The third group was formed in the house of Bigg Boss Marathi C group
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये तयार झाला तिसरा गट- “C” गृप 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस तेरावा
  • मीराचं ऐकला नाहीना तर तिचा तिळपापड होतो – स्नेहा वाघ
  • जयने दिली बिग बॉस यांना ऑर्डर ?

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस यांनी “जिंकू किंवा लढू” हे या आठवड्याचे साप्ताहिक कार्य असेल असे जाहीर केले. आणि या साप्ताहिक कार्याच्या अंतर्गत उपकार्य सदस्यांना देण्यात येणार आहेत असे देखील सांगितले. “माझे मडके भरी” हे पहिले उपकार्य अक्षय आणि विशालमध्ये झालेल्या भांडणामुळे रद्द करण्यात आले. आणि बिग बॉस यांनी सदस्यांना ताकीद देखील दिली अश्याप्रकारच्या कृत्याचा ते निषेध करतात. आज नवा दिवस... बघूया आज बिग बॉस सदस्यांना कोणता नवा टास्क देणार. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी घोषित केले आहे “घरातील फर्निचर पुढील आदेशापर्यंत वापरता येणार नाही”. आणि त्यामुळे घरामध्ये जरा चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. (The third group was formed in the house of Bigg Boss Marathi C group)
 
हा आदेश येताच सदस्य एकावर एक मजेदार वाक्य करण्यास सुरुवात केली. गायत्री आणि तृप्ती देसाई यांनी वाक्य टाकायला सुरुवात केली. तृप्ती म्हणाल्या हारे हारे हारे... तर गायत्री म्हणाली ‘जे वापरणार बेड त्यावर तृप्तीताई म्हणाल्या आमची डायरेक्ट पडणार रेड” आता सदस्यांना हे फर्निचर कसे मिळणार ? कुठला नवा टास्क बिग बॉस यांना देणार ? बघूया आजच्या भागामध्ये.
 
या उलट दुसरीकडे स्नेहा, सुरेखा कुडची, दादुस, तृप्तीताईंचा एका वेगळा स्वतंत्र गृप तयार झालेला दिसतो आहे. हा गट म्हणजे घरातला C गृप. तृप्ती ताई म्हणाल्या C फॉर क्लिअर. A च्या आणि B च्या बाजूने नसलेला गृप. तर आज याच गृपमध्ये चर्चा रंगणार आहे ज्यामध्ये स्नेहा यांना सांगताना दिसणार आहे मीरा मला सांगत होती त्या पेंटमध्ये पाणी टाकुया. आता तो ऑइल पेंट त्यात पाणी कसं मिक्स होणार. आणि तिचं नाही ऐकला तर तिचा तिळपापड होतो. आणि त्यांच्यासोबत देखील तेच झालं तिचं. आणि ती स्वत:चे नियम बनवते हे खरं आहे.”


“उत्कर्ष बोलबच्चन आहे” – विकास पाटील 

 बिग बॉस मराठी सिझन तिसरा सुरू झाला आणि काही दिवसातच घरातील काही सदस्य एका गृपमध्ये तर काही सदस्य दुसर्‍या गृपमध्ये दिसून आले. काही सदस्य नक्की कुठल्या गृपमध्ये हे काही कळत नव्हतं. पण जसजसे दिवस पुढे जात आहेत आता ते स्पष्ट होते आहे. काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक टास्क रंगला. त्यासाठी बिग बॉस यांनी दोन गृप घोषित केले. आणि त्याच टास्क संदर्भात आज विकास आपलं मत स्पष्टपाने मांडताना दिसणार आहे. आज घरामध्ये काय काय होणार ? कोणतं नवं आव्हान बिग बॉस सदस्यांसमोर उभ रहाणार ? बघूया आजच्या भागामध्ये.
 
मीनल, आविष्कार, विशाल आणि सोनालीला विकास सांगताना दिसणार आहे, “मला तुम्हाला उत्कर्षबद्दलचं माझं दिवसभरातला observation सांगायच आहे. पहिला टास्क जेव्हा आला ना तेव्हा त्याचं असं होतं मी त्यांची मडकी फोडणार. मला असं वाटलं त्याचा destruction वर जास्त भर आहे नाही की काहीतरी क्रिएट करण्यावर. त्याने हे प्लॅन केलंचं नाही की आपली मडकी कशी वाचवता येतील. मी जाऊन त्यांची मडकी फोडणार इतकचं त्याच म्हणणं होतं. दुसरी गोष्ट तो खूप बडबड करतो मी असं करेन, तसं करेन. मला महेशसर देखील म्हणाले ना मी हुशार आहे उगीच नाही बोले, बघ मी काय करतो असं तो तृप्तीताईंना सांगत होता. खरं सांगायच ना तर उत्कर्ष “बोलबच्चन” आहे त्याची मेंटल, Physical capability काही नाहीये”.
 
तर आज बिग बॉस सदस्यांना काही कोडी देणार आहेत आणि त्यांना ते शोधायचे आहे नक्की काय आहे टास्क कळेलच आज.


जयने दिली बिग बॉस यांना ऑर्डर ?
 

बिग बॉस आदेश देत आहेत, बिग बॉस सांगू इच्छितात असे आपण ऐकतो. पण जयने जरा काहीतरी वेगळेच केले आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काही गोष्टी सदस्यांना दिल्या जातात आणि काही गोष्टींपासून त्यांना वंचित राहावे लागते. कधी कधी बिग बॉस त्यांना या गोष्टी मिळविण्याची संधी देखील देतात. पण जयने न राहून बिग बॉस यांनाच ऑर्डर दिली आहे. बिग बॉस माझ्यासाठी एक लोणच्याची बाटली पाठवून द्या, जर तुम्ही आमच्यावर प्रेम करता तर”. तृप्तीताई म्हाणल्या “सारखं आपलं तुम्ही आमच्या प्रेम करत असाल तर हे पाठवून द्या, ते पाठवून द्या... गायत्री म्हणाली, “त्यांच्या ठरलेल्या गोष्टींपैकी ते पाठवतील ते प्रेम असेल तर बाकी काही नवीन पाठवणार नाहीत. जय, स्नेहा, गायत्री, सूरेखाताई, तृप्तीताई, मीरा सगळेच बसून जेवणाचा आनंद घेताना दिसत आहेत. कोणाला चाईनीज खायचं आहे तर कोणाला लोणच तर कोणाला वेज ट्रिपल शेजवान फ्राइड राइस खायचा आहे तर कोणाला चिकन तर कोणाला मंचुरियन तर कोणाला पनीर चिली. यांच्या डिमांडकडे बघून असं वाटत आहे सदस्य विसरले आहेत ते बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रेस्टोरंट मध्ये नाही. पुढे जयचं म्हणणं होतं अजून जास्त प्रेम करत असाल तर लस्सी पाठवा. एक नाही संपत तर दुसरी डिमांड तयार होती. असो ! इच्छा व्यक्त करूनच त्यांना जरा बरं वाटलं असावं असं म्हणायला हरकत नाही ! 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी