अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूतविषयी 'ही' गोष्ट आली समोर

Sushant Singh Rajput proposed Ankita Lokhande: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांनी बरीच वर्ष एकमेकांना डेट केलं होतं. जाणून घ्या या दोघांविषयी खास गोष्टी: 

Sushant Singh Rajput and Ankita Lokhande
सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत होते सहा वर्ष रिलेशनशीपमध्ये
  • अंकिता सुशांतपेक्षा २ वर्षाने होती मोठी
  • रियालिटी शोच्या स्टेजवरच सुशांतने अंकिताला केलं होतं प्रपोज

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) आपली को-स्टार अंकिता लोखंडेसोबत (Ankita Lokhande) बरेच दिवस रिलेशनशीपमध्ये होता. या दोघांची लव्ह स्टोरी खूपच रंजक आहे. दोघे एकत्र असताना असं वाटायचं की, जणू एकमेकांसाठी बनलेले आहेत. त्यांच्या  चाहत्यांना देखील अशीच आशा होती की, हे दोघे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकतील. पण सहा वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्यांचं ब्रेकअप झालं. 

सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे हे पहिल्यांदा पवित्र रिश्ता या मालिकेच्या सेटवर भेटले होते. या मालिकेत हे दोन्ही स्टार मुख्य भूमिकेत होते. सुशांत हा मानवाची (Manav) भूमिका साकारत होता तर अंकिता लोखंडे अर्चनाची भूमिका निभावत होती. याच मालिकेच्या सेटवर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. पण काही काळानंतर सुशांत सिंह राजपूतने पवित्र रिश्ता या मालिकेतून निरोप घेतला.

रिअॅलिटी शोच्या स्टेजवर केलं होतं प्रपोज 

सुशांत आणि अंकिता हे 'झलक दिखला जा सीझन 4' मध्ये एकत्र होते. या; रिअॅलिटी शोच्या स्टेजवर सुशांत सिंह राजपूतने आपल्या परफॉर्मन्सनंतर अंकिता लोखंडे हिला अतिशय रोमँटिकपणे प्रपोज केलं होतं.(Proposed) सुशांतने २०११ मध्ये तिला प्रपोज केलं होतं आणि अंकिताने देखील त्याचं प्रपोज हसत-हसत स्वीकारलं होतं. दोघेही बराच काळ लिव्ह-इनमध्ये होते.

अंकिता सुशांतपेक्षा वयाने मोठी 

टीव्ही मालिकेवरुन चित्रपटाकडे वळलेली अंकिता लोखंडे ही सुशांत सिंह राजपूतपेक्षा वयाने मोठी आहे. अंकिताचा जन्म १९ डिसेंबर १९८४ रोजी झाला होता तर सुशांतचा जन्म २१ जानेवारी १९८६ रोजी झाला होता. २०१६च्या सुरूवातीला सुशांतने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अंकितासोबत लग्न करण्याची घोषणाही केली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी