एकेकाळी टीव्ही विश्वात होता यांचा दबदबा, मालिका सोडल्या आणि बसावं लागलं घरी

मालिका-ए-रोज
Updated Mar 21, 2023 | 17:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Hindi Television हिंदी टेलिव्हिजनविश्वात अश्या काही अभिनेत्री आहेत ज्यांनी मालिका सोडल्यानंतर त्या कोणत्याच नव्या प्रोजेक्टमधून दिसून आल्या नाहीत. 

छोट्या पडद्यावरील या सुप्रसिद्ध अभिनेत्री सध्या बसल्या घरी
गतवर्षी नियाने 'जमाई से घर- घर' मध्ये तिच्याकडे सध्या काहीच काम नसून तिला पैशांची गरज असल्याचे सांगितले होते.   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • या अभिनेत्रीमधल्या अनेकजणीना मालिका सोडल्यानंतर कुठेच काम मिळू शकले नाही.
  • काही मुलाखतीच्या मध्यमतून काम मिळत नसल्याची खंत देखील बोलून दाखवली

नवी दिल्ली : हिंदीच्या छोट्या पडद्यावरील अश्या अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी आपल्या शानदार अभिनयाने घराघरात नाव कमावले. यांतील काहींना तर लोकं आजही त्यांच्या खऱ्या नावाने नव्हे तर त्यांनी केलेल्या भूमिकेच्या नावाने ओळखतात. आज यांपैकी अनेकजणी छोट्या पडद्यापासून दूर आहेत. एकेकाळी छोट्या पडद्यावर विशेष स्थान असलेल्या या अभिनेत्रीमधल्या अनेक जणीना मालिका सोडल्यानंतर कुठेच काम मिळू शकले नाही. यातील काहींनी मुलाखतीच्या मध्यमतून काम मिळत नसल्याची खंत देखील बोलून दाखवली आहे.  

आज आम्ही हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील अश्या काही अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत ज्या त्यांच्या काळात सुप्रसिद्ध होत्या, मात्र मालिका सोडून दिल्यानंतर त्या अनेकवर्ष घरी बसल्या आहेत.

हे पण वाचा : ​Jawan Moive release date: सलमान खानमुळे शाहरुख खानच्या जवानला अडथळा; रिलीज तारीखेत होणार बदल? डंकी साठीही करावा लागेल Wait

अंकिता लोखंडे 

अंकिता लोखंडे ने एका मुलाखतीत सांगितले की, मणिकर्णिकानंतर ती भूमिकेसाठी आसुसलेली आहे. पवित्र रिश्ता मधून घराघरात पोहोचणाऱ्या या अभिनेत्रीने मणिकर्णिका द्वारे बॉलीवूड मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर ती टायगर श्रॉफ च्या बागी 3 मध्ये दिसून आली. मात्र, आता तिला हिंदी सिनेमात काम मिळत नाही आहे.

दीपिका कक्कड़ इब्राहिम

ससुराल सिमर का ही हिंदी मालिका एकेकाळी खूप गाजली होती. पण या मालिकेनंतर एक दोन म्युझिक व्हीडियो सोडले तर अधिक काळ दीपिका कोणत्याच मोठ्या प्रोजेक्टमधून दिसून आली नाही. 

हे पण वाचा : ​Shikha Singh : 'कुमकुम भाग्य'च्या अभिनेत्रीला झाला गंभीर आजार

रुबिना दिलेक 

छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत रुबिनाचा समावेश आहे. शक्ति या मालिकेमधून लोकांच्या घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री छोट्या पडद्यावर बरेच महीने दिसून आलेली नाही आहे. मागील एक वर्षापासून रुबिनाकडे कोणतेच खास काम नाही आहे. 

दिव्यांका त्रिपाठी

बनू मै तेरी दुल्हन या गाजलेल्या मालिकेमुळे दिव्यांकाला ओळख मिळाली होती. मात्र त्यानंतर ती कोणत्याच मालिकेत दिसून आलेली नाही. अनेक काळापासून ती मालिका विश्वातून दूर आहे.

हे पण वाचा : ​Tesla Car Video: ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या नाटू-नाटू गाण्यावर टेस्ला कारचा अप्रतिम डान्स, पहा VIDEO

निया शर्मा 

गतवर्षी नियाने 'जमाई से घर- घर' मध्ये तिच्याकडे सध्या काहीच काम नसून तिला पैशांची गरज असल्याचे सांगितले होते. निया देखील बऱ्याच काळापासून मोठ्या प्रोजेक्टद्वारे दिसून आलेली नाही. तिला गेल्यावर्षी झलक दिखला जा सीजन 10 मध्ये पाहिले होते.           

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी