Horror Webseries and Movies : Netflixवर रिलीज होणार 'या'५ हॉरर वेबसीरिज आणि सिनेमा, एकट्याने चुकूनही पाहू नका

मालिका-ए-रोज
Updated Aug 24, 2022 | 00:21 IST | टाइम्स नाऊ मराठी

Horror Movies And Web-Series On Netflix: नेटफ्लिक्सच्या (Netflix) सब्सक्राइबर्सना या प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा जास्त चित्रपट आणि वेबसीरिजची भेट मिळणार आहे. विशेषत: जर तुम्हाला हॉरर सीरिज आवडत असेल तर लवकरच नेटफ्लिक्सवर एकापेक्षा एक हॉरर चित्रपट आणि वेब सिरीज (Horror webseries and movies ) येणार आहेत.

These 5 upcoming horror webseries on Netflix here is list
ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिळणार हॉरर वेबसीरिजची ट्रीट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नेटफ्लिक्सवर लवकरच 5 हॉरर वेबसीरिज आणि सिनेमा रिलीज होणार
  • ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना हॉरर वेबसीरिज आणि सिनेमांची मिळणार ट्रीट
  • या वेबसीरिज एकट्याने चुकूनही पाहू नका

Horror Movies And Web-Series On Netflix: ओटीटी प्लॅटफॉर्म (Ott platform ) आता हळूहळू लोकांची पहिली पसंती बनत आहे. चित्रपटांपासून वेब सीरिजपर्यंत, रोमान्सपासून भयपटापर्यंत… सर्व काही OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. नेटफ्लिक्सच्या  (Netflix) सब्सक्राइबर्सना प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा सरस चित्रपट आणि वेब सीरिजची भेटही मिळणार आहे. खासकरून जर तुम्हाला हॉरर सिनेमा आवडत असेल तर लवकरच नेटफ्लिक्सवर एकापेक्षा जास्त हॉरर चित्रपट आणि वेब सिरीज ( Horror Movies And Web-Series On Netflix ) येणार आहेत. ( These 5 upcoming horror webseries on Netflix here is list )

द मिडनाइट क्लब (The Midnight Club)

नेटफ्लिक्सवर येणाऱ्या द मिडनाईट क्लबबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. वेब सीरिज 7 ऑक्टोबर 2022 रोजी OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल. ही एक अमेरिकन हॉरर मिस्ट्री थ्रिलर वेब सिरीज आहे जी माइक फ्लॅनगन आणि लीह फॉंग यांनी बनवली आहे. वेब सिरीजची कादंबरी द मिडनाइट क्लबच्या कथेवर आधारित आहे.

अधिक वाचा : अक्षय कुमार-अर्शद वारसी येणार आमने-सामने

कॅबिनेट ऑफ क्यूरियोसिटीज (The Cabinet of Curiosities)

कॅबिनेट ऑफ क्युरिऑसिटी ही वेब सिरीज ही अमेरिकन हॉरर अँथॉलॉजी सिरीज आहे, जी 25 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होईल. या वेबसीरिजमध्ये 8 भयकथा दाखवल्या जाणार आहेत. जो क्लासिकल हॉरर जॉनर आहे. डेल टेरोने या वेबसीरिजचे दोन भाग तयार केले आहेत.


द फॉल ऑफ द हाउस ऑफ अशर (The Fall of the House of Usher)

द फॉल ऑफ द हाऊस ऑफ अशर ही माइक फ्लॅनागन दिग्दर्शित एक भयपट वेबसीरिज आहे. वेब सीरिजची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, परंतु या वर्षाच्या अखेरीस ती रिलीज होण्याची शक्यता आहे. या वेबसीरिजमध्ये ब्रूस ग्रीनवुड, मेरी मॅकडोनेल, मार्क हॅमिल आणि कार्ला गुगिनो सारखे कलाकार दिसणार आहेत.

 

अधिक वाचा : या फॅशन शोमध्ये आदित्य आणि अनुष्का भेटले होते पहिल्यांदा


वेडनेसडे एडम्स (Wednesday Addams)

या वर्षाच्या अखेरीस Netflix वर ही वेबसीरिज रिलीज होऊ शकतो. अमेरिकन कॉमेडी हॉरर वेब सिरीज डिसेंबरमध्ये नेटफ्लिक्सवर दाखल होऊ शकते, जी अ‍ॅडम्स फॅमिली वेडसडेच्या पात्रावर आधारित आहे.

द मंस्टर्स (The Munsters)

द मंस्टर्स सप्टेंबरमध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज होईल. हा या वर्षातील बहुप्रतिक्षित हॉरर चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात जेफ डॅनियल फिलिप्स, डॅनियल रोबक आणि मून झोम्बी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट त्याच नावाच्या फॅमिली ड्रामा सिटकॉमवर आधारित आहे.

अधिक वाचा : Khatron Ke Khiladi 12 च्या कलाकारांनी केली जोरदार पार्टी

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी