Hindi Television: श्वेता तिवारीपासून ते डिम्पी गांगुलीपर्यंत हिंदी टीव्हीच्या या टॉप अभिनेत्रींनी केली दोन लग्न

मालिका-ए-रोज
Updated Mar 24, 2023 | 04:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tv Actress Married Twice : मनोरंजन सृष्टीतील कलाकारांचे आयुष्य हा चर्चेचा विषय असतो. त्यांच्या खाजगी आयुष्यात काय चालले आहे ही जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकांना असते. मग ते त्यांचे वैवाहिक आयुष्य असो वा प्रेमप्रकरण असो सामान्य लोकांना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. आम्ही इथे हिदी टेलिव्हिजन क्षेत्रातील अशा टॉप अभिनेत्रींचा उल्लेख करणार आहोत, ज्यांनी एक लग्न विस्कटल्यामुळे दुसऱ्यांदा संसार थाटले.

हिंदी टीव्हीच्या या टॉप अभिनेत्रींनी केली दोन लग्न
टेलीव्हीजन क्षेत्रातील कित्येक स्टार अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा संसार थाटले  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी दुसऱ्यांदा लग्न केले
  • टेलीव्हीजन क्षेत्रातील कित्येक स्टार अभिनेत्रींनी दुसऱ्यांदा संसार थाटले
  • काहींचे दुसरे लग्न यशस्वी झाले तर काहीचे अयशस्वी

Hindi Television Top Actresses, These are top hindi television actress married twice :  सिनेमा असो वा मालिका, इथे नाती कधी टिकतात तर कधी तुटतात. एकीकडे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी दुसऱ्यांदा लग्न केले आहेत. तर दुसरीकडे टेलीव्हीजन क्षेत्रातील स्टार अभिनेत्रींनीदेखील दुसऱ्यांदा संसार थाटल्याचे आपण पाहिले आहेत. टेलिव्हिजन क्षेत्रातील या सुप्रसिद्ध अभिनेत्रींचे पहिले लग्न वेगवेगळ्या कारणांनी तुटले जरी असले, तरी त्यांच्या प्रेमाने त्यांना पुन्हा एकदा नवीन वैवाहिक आयुष्याची सुरुवात करून दिली. 

आज आम्ही टीव्हीच्या अशा काही अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी दुसऱ्यांदा लग्न केले आहेत, यांपैकी काहींचे वैवाहिक जीवन यशस्वी झाले आहेत तर काहींचे अयशस्वी!

अधिक वाचा : ​Pooja Sawant : मराठी अभिनेत्री पूजा सावंत झाली क्वारंटाइन


दलजित कौर 

या यादीत अगदी ताजे नाव आहे दलजीत कौर चे.  बिग बॉस 16 चा स्पर्धक शालीन भानोतची दलजीत माजी पत्नी आहे. दलजीत ला शालीन पासून एक मुलगा असून तो तिच्यासोबत राहतो. तिने नुकतेच यूके स्थित बिझनेसमन निखिल पटेलसोबत पुन्हा संसार थाटला आहे. निखिलही घटस्फोटित असून त्याला दोन मुली आहेत. दोघांनी 18 मार्च 2023 रोजी लग्न केले    

श्रद्धा निगम 

अभिनेत्री श्रद्धा निगमचे पहिले लग्न अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत झाले होते, मात्र वर्षभरानंतर त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर 2012 मध्ये श्रद्धाने मयंक आनंदसोबत लग्न केले आणि दोघेही आपले वैवाहिक जीवन आनंदाने जगत आहेत.

अधिक वाचा : ही औषधी वनस्पती करते मधुमेहापासून झटक्यात सुटका

चाहत खन्ना

चाहत खन्ना या अभिनेत्रीचे पहिले लग्न भरत नरसिंघानीसोबत झाले होते, मात्र घरगुती हिंसाचारामुळे तिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतला. यानंतर चाहतने फरहान मिर्झासोबत लग्न केले होते. मात्र, चाहतचे दुसरे लग्न देखील जास्त काळ टिकू शकले नाही. आता ती सिंगल मदर असून तिला दोन मुलं आहेत. 

गौतमी कपूर

हिंदी टेलिव्हिजन विश्वात गौतमी कपूर आणि राम कपूर यांचे वैवाहिक जीवन आदर्श असे मानले जाते. मात्र, गौतमीचा राम हा दूसरा पती आहे, हे फार कमी जणांना माहिती आहे.  गौतमीचे पहिले लग्न कमर्शियल फोटोग्राफर मधुर श्रॉफसोबत झाले होते. मात्र, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोघे वेगळे झाले. यानंतर राम आणि गौतमी यांची भेट झाली, या दोघांमध्ये प्रेम झाले आणि त्यांनी लग्न केले. आज ते दोघे खूप आनंदी आहेत. 

डिंपी गांगुली 

डिंपी गांगुलीने इमॅजिन टीव्हीचा स्वयंवर रिएलिटी शो 'राहुल दुल्हनिया ले जाएगा' याट भाग घेतला होता. ज्यात तिने राहुल महाजन सोबत लग्नाचे सात फेरे घेतले होते. मात्र, पाच वर्षानंतर डिंपी आणि राहुल विभक्त झाले. त्यानंतर पुन्हा एकदा डिंपीच्या आयुष्यात नवा साथीदार आला. तिने 2015 मध्ये तीचा शालेय मित्र रोहित रॉयसोबत दुसरे लग्न केले. 

अधिक वाचा : ​कधी असतो जागतिक टीबी डे? काय आहे या दिवसाचे महत्त्व?

श्वेता तिवारी

वयाच्या १८ व्या वर्षी श्वेताने राजा चौधरीसोबत प्रेमविवाह केला होता.  मात्र, 9 वर्षांनंतर घरगुती हिंसचारामुळे श्वेता राजापासून विभक्त झाली. श्वेताने राजावर अनेकदा मारहाण आणि छळ केल्याचा आरोप केला होता. 2012 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला आणि 2013 मध्ये तिने टीव्ही स्टार अभिनव कोहलीचा हात धरला. मात्र, श्वेताचे दुसरे लग्न देखील जास्त वेळ टिकू शकले नाही. श्वेता सध्या सिंगल मदर असून तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी आणि दुसऱ्या पतीपासून एक मुलगा आहे. 

दीपिका कक्कर

दीपिका कक्करने शोएब इब्राहीमशी दूसरा संसार थाटला आहे. तिचे पाहिले लग्न रौनक सॅमसनशी झाले होते. मात्र तीचे हे पहिले लग्न अयशस्वी झाले. त्यानंतर तिने शोएब इब्राहिमचा हात धरला. आज ती शोएब सोबत सुखी वैवाहिक जीवन जगत असून लवकरच हे जोडपे गुड न्यूज देणार आहे. 

रेणुका शहाणे

नव्वदीच्या दशकातील टीव्ही अभिनेत्री रेणुका शहाणे चे पहिले लग्न अयशस्वी झाले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर ती बॉलीवूडचा प्रसिद्ध कलाकार आशुतोष राणाच्या प्रेमात पडली. 2001 मध्ये या दोघांनी लग्न केले, आज राणा दाम्पत्य सुखी वैवाहिक जीवन जगत असून दोघांना दोन मुले देखील आहेत.

  
    

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी