Shashank Ketkar on Holi : होळी हा सण लहाणांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा असतो. शिमग्यासाठी कोकणी माणूस तर वर्षभर गावी जायची वाट बघत असतो. ही होळी गावच्या वेशीबाहेर पेटवली जाते. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर होळी साजरी केली जाते. पण आजकाल मात्र होळीच्या दिवशीच रंगपंचमी साजरी केली जाते.
हा प्रकार हिंदी मालिकांमध्ये नेहमी दाखवला जातो. पण आता मात्र मराठी मालिकांमध्ये सुध्दा हे सहज दाखवले जाते. या सर्व प्रकरणावर अभिनेता शशांक केतकरने आपले मत मांडले आहे. त्याने मराठी वाहिन्यांना आपली संत्कृती जपण्याचे आवाहन केले आहे.
शशांकने तेजश्री प्रधान सोबत होणार सून मी या घरची या मालिकेतून मराठी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. प्रेक्षकांनी नेहमीच त्याच्या कामाचं कौतुक केले आहे. आणि त्याने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सध्या तो शिवानी मुंढेकर सोबत स्टार प्रवाहच्या मुरांबा या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.
अधिक वाचा :उन्हाळ्यात या 3 ड्रिंक्सने मिळवा थंडा थंडा कूल कूल
सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट शेअर करत मराठ वाहिन्यांना सणांबद्दल जागे केले आहे. त्याने एक पोस्ट करत कालनिर्णयचा फोटो शेअर केला आहे. त्याने ६, ७ आणि १२ या तारखांवर गोल केलं आहे. यावर्षी ६ तारखेला होळी, ७ ला धूलिवंदन आणि १२ ला रंगपंचमी आहे. हा फोटो शेअर करत त्याने लिहिलं, 'हे तीन वेगळे सण असतात. कृपा करुन रंगपंचमीला होळी म्हणू नका.'
अधिक वाचा :रक्त वाढविण्यासाठी शिमला मिरची आहे फायदेशीर
त्याने निशाणा साधत लिहिलं आहे, 'आम्ही मराठी परंपरा जपतो असं म्हणणाऱ्या सर्व वाहिन्या, लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सर्वांसाठी हे आहे. आपण हिंदीचं अनुकरण बजेटमध्ये करतो का? नाही ना. मग चुकांमध्येतरी कशाला?' असं म्हणत वाहिन्यांचे डोळे उघडले आहेत. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.