Tula Pahate Re:‘तुला पाहते रे’ 20 वर्ष मागे जाणार, राजनंदीनीचा प्रोमो रिलीज

मालिका-ए-रोज
Updated Apr 22, 2019 | 13:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

‘तुला पाहते रे’ मालिका सर्वाधिक लोकप्रिय मालिकेमधली एक आहे. या मालिकेत गेले अनेक दिवस वाट पाहिली जात आहे ती राजनंदीनीच्या एन्ट्रीची. अखेर मालिकेचा नवीन प्रोमो भेटीला आला आणि प्रोमोमध्ये दिसते ती राजनंदीनी.

Top rated show Tula Pahate Re finally releases a new promo and it features actress Shilpa Tulaskar who plays the most awaited character Rajnandini
प्रश्न राजनंदिनीच्या अस्तित्वाचा, मागोवा 20 वर्षांपूर्वीच्या भूतकाळाचा  |  फोटो सौजन्य: Instagram

Tula Pahate Re TV Serial: ‘तुला पाहते रे’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतल्या रंजक कथानकाने प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरण्यास सतत यश मिळवलं आहे. अशीच उत्सुकता या मालिकेतल्या पात्राबद्दल अगदी सुरूवातीपासून होती. ते कॅरेक्टर म्हणजे विक्रांत सरंगजामेची पूर्व पत्नी राजनंदीनी. या मालिकेत राजनंदीनीचं महत्त्व केवढं आहे हे काय वेगळं सांगायला नको. त्यामुळे मालिकेत तिची एन्ट्री कधी होतेय याकडे प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या होत्या. अखेर मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज करण्यात आला आणि त्यात राजनंदीनीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळते. या प्रोमोने तर सोशल मीडीयावर एक वेगळाच उत्साह कायम केलाय. त्यात प्रेक्षकांचे कमेन्ट्स काही केल्या थांबत नाही आहेत.

 

 

प्रोमो अवघ्या काही सेकंदांचा आहे पण त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे मालिकेत होणारा बदल. मालिका आता इतिहासात जाणार असं या प्रोमोत ओघाने बघायला मिळते आणि हा इतिहास असणार आहे राजनंदीनीचा. तब्बल 20 वर्ष मालिका मागे जाणार असून राजनंदीच्या आयुष्याचे आणि त्याचसोबत विक्रांत सरंजामेच्या सगळ्या डावपेचांचा उलघडा होणार आहे. नुकताच विक्रांत म्हणजेच अभिनेता सुबोध भावेने त्याची पत्नी इशा म्हणजेच अभिनेत्री गायत्री दातारला बंद दरवाज्या पलिकडे नेलं. या बंद खोलीचा इतिहास, त्याच्या मागचं रहस्य सगळं आता मालिकेत या नवीन ट्विस्टमधून उलघडताना दिसेल. मालिकेतला हा नवीन बदल खूपच रंजक ठरेल हे नक्की पण त्याचसोबत मालिकेत आता इशा निमकर दिसणार नाही का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. कारण मालिका 20 वर्ष मागे गेली तर तेव्हा इशाचा जन्म ही झालेला नव्हता, त्यामुळे हा सगळा बदल मालिकेमधून गायत्रीला थोडे दिवस आराम देणारा ठरेल का ते बघावं लागेल.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial) on

 

सध्या मालिकेचा हा नवीन प्रोमो फारच गाजतो आहे. प्रोमोमधील राजनंदीनी म्हणजे अभिनेत्री शिल्पा तुळसकर फारच सुंदर आणि सालस लूकमध्ये दिसते. तिची एन्ट्री दिसते ते सरंजामे हाऊसमध्ये. म्हणजे सध्या सरंजामे कुटुंबाचं जिथे वास्तव्य आहे अगदी तिथेच. आणि याच घरात आहे ती बंद खोली. त्यामुळे या घरातंच हा नवीन ट्विस्ट रंगणार आणि इथेच या सगळ्याची सुरुवात लवकरच होणार असं दिसतंय. मालिकेच्या शिर्षक गीतात सुद्धा राजनंदीनीची आकृती पाहायला मिळते ते सुद्धा मालिकेच्या पहिल्या भागापासून. त्यामुळे मालिकेतलं या कॅरेक्टरचं महत्त्वं अगदी पहिल्या भागापासून बिंबवण्यात आलं होतं. अखेर बरेच दिवस उत्सुकता ताणून धरलेलं हे पात्र प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झालं आहे. हा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून 22 एप्रिल किंवा 23 एप्रिल रोजी राजनंदीनी अखेर मालिकेत दिसेल असं बोलंल जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Tula Pahate Re:‘तुला पाहते रे’ 20 वर्ष मागे जाणार, राजनंदीनीचा प्रोमो रिलीज Description: ‘तुला पाहते रे’ मालिका सर्वाधिक लोकप्रिय मालिकेमधली एक आहे. या मालिकेत गेले अनेक दिवस वाट पाहिली जात आहे ती राजनंदीनीच्या एन्ट्रीची. अखेर मालिकेचा नवीन प्रोमो भेटीला आला आणि प्रोमोमध्ये दिसते ती राजनंदीनी.
Loading...
Loading...
Loading...