Trupti Desai vs Sneha Wagh : तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघमध्ये झाला राडा 

Bigg Boss Marathi 3 : आता या चौघांनंतर स्नेहा आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये देखील मतभेद होताना दिसून येत आहेत. नक्की असे काय घडले ? कोणत्या विषयावरून, कोणावरून नक्की हे घडलं याच्यामागचं नेमकं कारण आजच्या भागामध्ये कळेलच. 

Trupti Desai and Sneha Wagh had an argument in house of bigg boss marathi 3
तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघमध्ये झाला राडा  
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 34 !
  • “………एवढं लक्षात ठेवा फक्त” – स्नेहा वाघने दिला इशारा
  • बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यामुळे बर्‍याच सदस्यांमध्ये मतभेद, भांडण होतं आहे.

Bigg Boss Marathi 3, Day 34 । मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या साप्ताहिक कार्यामुळे बर्‍याच सदस्यांमध्ये मतभेद, भांडण होतं आहे. या आठवड्यात जय मीरा - गायत्रीला आणि मीरा , गायत्री जयला बरंच काही बोलून गेले. ज्याबद्दल गायत्रीने तिचे मत उत्कर्षसमोर मांडले. बिग बॉसची चावडीमध्ये आलेल्या चुगलीनंतर आणि जयच्या वक्तव्यानंतर या चौघांमधील वाद वाढतच चालला आहे. कोणीच कमीपणा घ्यायला तयार नाहीये. उत्कर्ष त्याच्यापरीने गायत्री, मीरा आणि जयला समजावण्याचा प्रयत्न करतो आहे हे दिसून येतं आहे. आता या चौघांनंतर स्नेहा आणि तृप्ती देसाई यांच्यामध्ये देखील मतभेद होताना दिसून येत आहेत. नक्की असे काय घडले ? कोणत्या विषयावरून, कोणावरून नक्की हे घडलं याच्यामागचं नेमकं कारण आजच्या भागामध्ये कळेलच.  (Trupti Desai and Sneha Wagh had an argument in house of bigg boss marathi 3)


 
स्नेहा तृप्तीताईंना म्हणाली, बोला पुढे... तृप्तीताई म्हणाल्या, आपण खेळतो आहे ना, तर खेळाच्या मर्यादा ठेवल्या पाहिजेत. आणि आम्ही कधी मुद्दामून काहीचं केलेलं नाही. स्नेहा म्हणाली, पहिली गोष्ट म्हणजे मुद्दामून कधीच कोणी कोणाला काहीही करत नाही. तृप्ती देसाई म्हणाल्या, करत पण असेल काय माहिती. स्नेहाचे म्हणणे पडले शनिवारी कळेल. जे दिसेल ते कळेल. तृप्तीताई म्हणाल्या कळालं ते... स्नेहा म्हणाली, काय कळालं ? कोणीच काही बोलं नाही. तुम्हीच बोलत होता. तृप्तीताई स्नेहाला म्हणाल्या, आपण माणसं आहोत ना तर माणसाने माणसासारखा वागणं गरजेचं आहे. मारामार्‍या होतील, भांडण होतील... स्नेहा म्हणाली माणुसकी दाखवणं खूप गरजेचं आहे. कोणीही कोणाला घाबरत नाही. ना कोणाच्या आवाजाला कोणी घाबरत, न कोणाच्या फालतू बोलण्याला... एवढं लक्षात ठेवा फक्त.....”  तृप्ती देसाई म्हणाल्या, त्याचा संबंधच नाहीये...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी