असा असणार 'तुला पाहते रे' मालिकेचा शेवट?

मालिका-ए-रोज
Updated Jul 19, 2019 | 17:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tula Pahate Re to end: अल्पावधीतचं लोकप्रिय ठरलेली मालिका तुला पाहते रे अखेर प्रेक्षकांचा निरोप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. पण मालिकेचा शेवटचा भाग कसा असेल ती उत्सुकता अजूनही कायम आहे. वाचा सविस्तर कसा असेल शेवट.

Tula Pahate Re serial to end on this note with Vikrant Sarangjame’s suicide
‘तुला पाहते रे’ मालिकेचा शेवट गोड नाही?  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • असा असेल तुला पाहते रे मालिकेचा शेवट?
  • तुला पाहते रे मालिकेचा शेवट गोड नाही?
  • आणि विक्रांत घेणार अखेरचा निरोप?

मुंबई: 'तुला पाहते रे' मालिका वर्षभराच्या आतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली. मालिकेची आगळी-वेगळी लव्हस्टोरी आणि त्यातलं कास्टिंग तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. खासकरुन सुबोध भावे आणि गायत्री दातारची जोडी. मालिका कायम टीआरपीच्या गेममध्ये सुद्धा आपलं स्थान टिकवून होती आणि कायम पहिल्या पाच मालिकांमध्ये या मालिकेचा नंबर निश्चित असायचा. एवढंच काय तर आता मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे जाहीर झालं असताना सुद्धा गेल्या आठवड्यात टीआरपीमध्ये ही मालिका चौथ्या क्रमांकावर होती. त्यामुळे मालिकेची लोकप्रियता काही केल्या कमी होत नाहीये. त्याबद्दलची उत्सुकता आजही टिकून आहे आणि तेवढीच उत्सुकता आहे मालिकेच्या शेवटाबद्दलची सुद्धा.

मालिका प्रेक्षकांचा निरोप घेण्यासाठी सज्ज तर झालीये पण ती कसा निरोप घेणार आणि सगळ्यांच्या लाडक्या इशा आणि विक्रांतच्या आयुष्यात काय नवीन ट्विस्ट येणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मालिकेत सध्या विक्रांत इशाच्या प्रेमात पडला आहे, त्यात इशा प्रेग्नंट असल्याने तो तिची अधिकच काळजी करू लागला आहे. दुसरीकडे इशा सुद्धा त्याच्याशी थोडं बरं वागताना दिसत आहे. ज्यामुळे इतर सरंजामेंना आश्चर्याचा धक्का नक्कीच बसला आहे. त्यात इशाच्या बाबांनी विक्रांतला इशा हिच राजनंदिनी असून तिचा पुर्नजन्म असल्याचं सांगितलं आणि तिला राजनंदिनीबद्दल सगळं माहीत असल्याचं सुद्धा उघड केलं. याचा विक्रांतला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे तो खचलेला दिसतोय आणि त्यातून तो स्वतःला संपवणार असल्याचं समजतंय. त्यामुळे मालिकेचा शेवट गोड नसेल असा अंदाज बांधला जात आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

???????? Isha?vikrant @subodhbhave @gayatridatarofficial @shilpatulaskar #tulapahatere ??

A post shared by ❤Tula Pahate Re❤ (@tula_pahate_re_official_) on

 

होय, अगदी बरोबर वाचलंत तुम्ही. मालिकेचा नायक असलेला विक्रांत अचानक खलनायक म्हणून समोर आला आणि मालिकेला वेगळंच वळण मिळालं. आता अजून एक वळण देत हा विक्रांत सरंजामे आत्महत्या करत मालिकेचा शेवट करणार असल्याचं बोललं जात आहे. विक्रांत आता सुधारलाय आणि हे करुन तो प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहील असा तर्क सुद्धा लावला जात आहे. त्यामुळे खरंच असं होऊन मालिका निरोप घेणार की काहीतरी वेगळाच ट्विस्ट आणत मालिकेचा शेवट गोड होणार ते येत्या काही दिवसात कळेलंच. मालिकेचा उद्या म्हणजेज २० जुलै रोजी शेवटचा भाग प्रसारित होईल आणि तेव्हा बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील तर त्याची वाट पाहुयात आणि लाडक्या विक्रांत-इशाला अलविदा म्हणण्यासाठी सज्ज होऊयात. त्याचसोबत एक नवीन मालिका येत्या २२ जुलैपासून सुरु होणार आहे, त्याची उत्सुकता सुद्धा बरीच असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे तुला पाहते रे या मालिकेचा शेवट आणि अग्गंबाई सासूबाई या मालिकेची नवीन सुरुवात अनुभवायला प्रेक्षकांना मिळणार आहे. या नव्या मालिकेत तेजश्री प्रधान बऱ्याच वेळानंतर छोट्या पडद्याकडे परतली आहे. 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
असा असणार 'तुला पाहते रे' मालिकेचा शेवट? Description: Tula Pahate Re to end: अल्पावधीतचं लोकप्रिय ठरलेली मालिका तुला पाहते रे अखेर प्रेक्षकांचा निरोप घेण्यासाठी सज्ज झाली आहे. पण मालिकेचा शेवटचा भाग कसा असेल ती उत्सुकता अजूनही कायम आहे. वाचा सविस्तर कसा असेल शेवट.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Bigg Boss Marathi 2: ‘तिकीट टू फिनाले’ टास्क जिंकत 'हे' दोन स्पर्धक फिनालेमध्ये होणार दाखल
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Hollywood News: ड्वेन जॉन्सनच्या लग्नात पत्नीने घातला महागडा वेडिंग गाऊन; किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
[VIDEO]: 'या' सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार अभिनेता आमिर आणि सैफ अली खान
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
Batla House Day 6 collection: जॉन अब्राहमच्या बाटला हाऊस सिनेमाला विकडेला सुद्धा चांगला प्रतिसाद
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
forbes 2019: फोर्ब्स लिस्टमध्ये अक्षय कुमारचा दबदबा, सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांना मागे टाकले
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
हिमाचल प्रदेशातील अतिवृष्टीचा 'या' अभिनेत्रीला फटका, सिनेमाची संपूर्ण टीम अडकली
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
ऐश्वर्या-अभिषेक बच्चनच्या लग्नातील न पहिलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल 
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स 
[VIDEO] भाबीजी घर पर हैं अभिनेत्री अनिता भाभीचा हॉट डान्स