Smriti Irani: 'तुलसी इज बॅक' स्मृती इराणीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून लोकही आश्चर्यचकित, इंस्टाग्रामवर मागितल्या टिप्स

Smriti Irani:स्मृती इराणीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सडपातळ दिसत आहे. सोशल मीडियावर, यूजर्स स्मृती इराणीच्या वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन लुकचे कौतुक करत आहेत आणि टिप्स देखील विचारत आहेत. इतकेच नाही तर अनेक यूजर्स स्मृती इराणी यांच्याकडून मोटिवेट झाले आहेत.

'Tulsi Is Back' Smriti Irani's transformation, weight loss....
स्मृती इराणी.... वेट लॉस आणि बरंच काही....  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्मृती इराणीचे ट्रान्सफॉर्मेशन....
  • चाहत्यांनी मागितल्या वेट लॉसच्या टिप्स
  • 'तुलसी इज बॅक....'

Smriti Irani:स्मृती इराणीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूपच सडपातळ दिसत आहे. सोशल मीडियावर, यूजर्स स्मृती इराणीच्या वेट लॉस ट्रान्सफॉर्मेशन लुकचे कौतुक करत आहेत आणि टिप्स देखील विचारत आहेत. इतकेच नाही तर अनेक यूजर्स स्मृती इराणी यांच्याकडून मोटिवेट झाले आहेत.

 कॅबिनेट मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani)या भारतीय राजकारणातील सर्वात मोठ्या महिला नेत्यांपैकी एक आहेत आणि अनेक महिलांसाठी प्रेरणा आहेत. 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या स्मृती इराणी यांनी तुलसीच्या भूमिकेत आपली छाप सोडली. त्या मालिकेला वीस वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही फॅन्स त्या भूमिकेची आजही आठवण काढत आहेत.


स्मृती इराणी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीतही प्रभावी छाप सोडली आहे. एक यशस्वी अभिनेत्री बनून राजकारणी, स्मृती इराणी सध्या वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. स्मृतीच्या या नव्या लुकमुळे फॅन्स अवाक झाले आहेत.  इतकेच नाही तर लोकं त्यांच्या ट्रॉन्सफॉर्मेशनमुळे प्रेरित झाले आहेत. आणि सोशल मीडियावर वजन कमी करण्याच्या टिप्स देखील विचारत आहेत. लोकांनी तर आपल्या लाडक्या तुलसीवर अर्थातच स्मृती इराणी यांच्यावर स्तुतिसुमनं सुद्धा उधळली आहेत. तर अनेक सोशल मीडिया युजर्स 'तुलसी परत आली' असा दावा करत आहेत.

स्मृती इराणी यांनी नुकतंच आपल्या इन्स्टाग्रामवरील प्रोफाइल बदलले. यामध्ये स्मृती साडी नेसून साइड पोजमध्ये दिसत आहेत. याशिवाय त्यांनी आणखी एक फोटो शेअर केला. ज्यात त्या झाडाजवळ उभी राहून फुलाकडे पाहत आहे. यूजर्स त्यांच्या या फोटोंचे खूप कौतुक करत आहेत, तसेच  फोटो कॅप्शनची देखील खूप चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये स्मृती इराणी यांनी लिहिले आहे, 'जे आवाक्याबाहेर आहे, तिथेच आहे... फुले तोडू नका.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी