Dhanashri Kadgaonkar: अभिनेत्री धनश्री काडगांवकरने दिला गोंडस बाळाला जन्म

Actress Dhanashri Kadgaonkar blessed with baby boy: अभिनेत्री धनश्री काडगांवकर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. स्वत: अभिनेत्री धनश्रीने ही गोड बातमी सोशल मीडियात पोस्ट करुन दिली आहे.

dhanashri kadgaonkar gives birth to baby boy
अभिनेत्री धनश्री काडगांवकरने दिला गोंडस बाळाला जन्म  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • धनश्री काडगांवकर हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला
  • २८ जानेवारी रोजी दिला बाळाला जन्म 
  • सोशल मीडियाच्या माध्यमातून धनश्रीने सर्वांना दिली ही आनंदाची बातमी

मुंबई : मराठी मालिका 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzhat jeev Rangala) फेम अभिनेत्री धनश्री काडगांवकर हिच्या घरी नवीन पाहुण्याचं आगमन झालं आहे. धनश्री काडगांवकर (Dhanashri Kadgaonkar) हिने २८ जानेवारी २०२१ रोजी एका गोंडस बाळाला जन्म (birth to baby boy) दिला आहे. सोशल मीडियातील इंस्टाग्राम अकाऊंटवरुन धनश्री काडगांवकर हिने ही गोड बातमी सर्वांना दिली आहे.

इंस्टाग्रामवर खास पोस्ट 

आपण एका बाळाला जन्म दिल्याची बातमी धनश्रीने इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून सर्वांना दिली आहे. आपल्या पोस्टमध्ये धनश्रीने म्हटलं, "आम्हाला आपल्यास सांगण्यास खूपच आनंद होत आहे की आज सकाळी बाळाला जन्म दिला. मी आणि बाळ आम्ही दोघेही सुखरुप आणि सुदृढ आहोत. तुम्ही सर्वांनी दिलेलं प्रेम, शुभेच्छा आणि आशिर्वाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार."

धनश्री काडगांवकर ही 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका करत होती. आपण गरोदर असल्याची गुड न्यूज सुद्धा धनश्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करुन दिली होती. त्यानंतर आता गोंडस बाळाला जन्म दिल्याची बातमीही तिने इंस्टाग्रामवरुन दिली आहे.

गरोदर असल्यामुळे धनश्री शूटिंगपासून दूरच होती. गेल्या महिन्यात धनश्रीचे बेबी शॉवर करण्यात आले होते. याचे फोटोजही धनश्रीने सोशल मीडियात पोस्ट केले होते. या फोटोजमध्ये धनश्री आपला पती दुर्वेश देशमुख याच्यासोबत दिसत असून ती खूपच आनंदीही असल्याचं पहायला मिळालं होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी