Tuzyat Jeev Rangala : 'तुझ्यात जीव रंगला'फेम अभिनेत्रीचा कोल्हापूरात अपघात, डंपरच्या धडकेने जागीच मृत्यू

मालिका-ए-रोज
Updated Nov 13, 2022 | 13:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tuzyat Jeev Rangala : मराठी इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्मॉल स्क्रीनवरील मालिका 'तुझ्यात जीव रंगला'(Tuzyat Jeev Rangala) फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा (Kalyani kurale-jashav) अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्हापूर-सांगली महमार्गावर डंपरच्या धडकेने अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला.

tuzyat jeev rangala fame actress died in road accident
'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेत्रीचा मृत्यू
  • अभिनेत्री कल्याणी-कुरळे जाधवचा रस्ते अपघातात मृत्यू
  • डंपरच्या धडकेने कल्याणीचा कोल्हापूर-सांगली महामार्गावर जागीच मृत्यू

Tuzyat Jeev Rangala : 'तुझ्यात जीव रंगला' (Tuzyat Jeev Rangala) फेम अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधवचा (Kalyani kurale-jashav) अपघात झाला असून या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याणीचा कोल्हापूर सांगली महामार्गावरील हालोंडीजवळ डंपरने धडक दिल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ही बातमी समोर येताच अनेकांना मोठा धक्का बसला आहे. (tuzyat jeev rangala fame actress died in road accident)

अधिक वाचा : शोएब मलिकचे अभिनेत्री आयशा उमरसोबतचे फोटो व्हायरल

कल्याणीने 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेप्रमाणेच अनेक मालिकांमधून अभिनयात ठसा उमटवला होता. काही दिवसांपूर्वीच कल्याणी कुरळे-जाधवने 'प्रेमाची भाकरी' हे हॉटेल सुरू केले होते. हॉटेल बंद करून बाहेर पडत असतानाच डंपरने धडक दिली. या धडकेत अभिनेत्रीचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच कल्याणीने तिचा वाढदिवस साजरा केला होता. इंस्टाग्रामवर कल्याणीने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये ती भाकऱ्या थापताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत कल्याणीने म्हटलं, "माझा वाढदिवस मी लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला देण्यात घालवला... मला खूप आनंद झाला मी माझा वाढदिवस साजरा करण्या साठी कुठे बाहेर गेले नाही ना पार्टी केली... मी माझ्या वाढदिवसानिमित्त लोकांना प्रेमाची भाकरी करून खायला घातली हे फक्त स्वामींनी माझ्या कडून करून घेतले आहे. असेच प्रत्येक वाढदिवसाला होऊदे .. स्वामी मला तुमचे आशीर्वाद तर आहेतच असेच आशीर्वाद नेहमी असुदेत .. मला हे सगळ करण्यासाठी शक्ती द्या". कल्याणीच्या अपघाती मृत्यूनंतर तिची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

अधिक वाचा : सानिया मिर्झाचा होता शाहीद कपूरवर क्रश


झी मराठीवरील गाजलेली मालिका म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला'. राणादा आणि अंजली बाईंची या मालिकेतील जोडी खूपच गाजली. त्यांच्या जोडीप्रमाणेच मालिकेतील इतर कलाकारही गाजले. त्यांच्याही कामाचं कौतुक करण्यात आलं. कल्याणी कुरळे-जाधवने या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी