'राणादा'च्या ऑनस्क्रिन वडिलांना खऱ्या पोलिसांनी केली अटक 

मालिका-ए-रोज
Updated Jun 18, 2019 | 22:52 IST | टाइम्स नाऊ मराठी

तुझ्यात जीव रंगला मालिकेतील एका अभिनेत्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

milind dastane
मिलिंद दास्ताने 

मुंबई : राणा आणि पाठक बाई यांच्या लव्हस्टोरीवर आधारित तुझ्यात जीव रंगला या मालिकेने सुरू झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मने जिंकण्यात यश मिळवले होते. या मालिकेने दोन नवे चेहरे मराठी इंडस्ट्रीत खूपच फेमस झाले त्यासोबतच या मालिकेतील पात्रांनी लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. राणादाचे कुटुंबीय असो वा पाठकबाईंच्या छोट्या कुटुंबातील माणसे ही सर्वच पात्रे प्रेक्षकांना आपली आपलीशी वाटू लागली. यातच या मालिकेतील राणादाच्या वडिलांची भूमिका करणारे अभिनेते मिलिंद दास्ताने यांना पोलिसांनी अटक केली आहे. मिलिंद दास्ताने यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. दोघांनाही न्यायालयात हजर केलं असता २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
 
या मालिकेत रांगडा राणादा याचे वडील राजकारणी प्रतापराव गायकवाड हे पात्र दाखविले आहे. या राणादाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे अभिनेते मिलिंद दास्ताने यांनी. दरम्यान, मिलिंद दस्ताने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका प्रसिद्ध ज्वेलर्सची फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अभिनेता मिलिंद यांनी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्समधून २५ लाखांचे दागिने विकत घेतले मात्र खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे न दिल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली  होती.  औंध येथील त्यांनी ज्वेलर्सच्या दुकानातून ही खरेदी केली होती. अक्षय गाडगीळ यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी मिलिंद दस्ताने यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

तुझ्यात जीव रंगला या मालिकेने मिलिंद दस्ताने यांना मोठी ओळख मिळवून दिली. या मालिकेने प्रतापराव गायकवाड हे पात्र घरांघरांत पोहोचले.या मालिकेने त्यांना अमाप प्रसिद्धी केली. त्यांनाच नव्हे तर या मालिकेतील इतर पात्रांनाही मालिकेने घरांघरात स्थान मिळवून दिले. मालिकेच्या सुरूवातीला राणादा आणि पाठकबाई यांच्या लव्हस्टोरीचा ट्रॅक होता. शेतकरी असून अशिक्षित असलेला राणादा आणि शहरात शिकलेल्या पाठक बाई एकमेकांच्या कसे प्रेमात पडतात.

सुरूवातीला राणादा हा बायकांशी बोलायलाही घाबरत असतो मात्र कालांतराने पाठकबाईंच्या सहवासाने तो त्यांच्या प्रेमात पडतो आणि त्यांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात होते. त्यांच्या लग्नाचेही व्हिडिओ तसेच गाणे सोशल मीडियावर चांगलेच गाजले होते. या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारली आहे ती धनश्री काडगांवकर हिने. या मालिकेत ती राणादाची वहिनी आहे. तिला घरातील सर्व सत्ता हवी असते. त्यामुळेच ती विविध डावपेच रचत असते. मात्र पाठकबाई या सर्व खेळींना चांगले प्रत्युत्तर देतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
'राणादा'च्या ऑनस्क्रिन वडिलांना खऱ्या पोलिसांनी केली अटक  Description: तुझ्यात जीव रंगला मालिकेतील एका अभिनेत्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles