टीव्ही अभिनेत्याची आत्महत्या, कोरोनाच्या भीतीने मृतदेह खाली उतरवण्यास कोणीही केली नाही मदत

Manmeet Grewal suicide: टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. या घटनेनंतर मनमीतच्या मित्राने धक्कादायक खुलासा केला आहे. 

manmeet grewal
टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल 

थोडं पण कामाचं

  • राहत्या घरात अभिनेता मनमीत ग्रेवालने घेतला गळफास 
  • 'आदत से मजबूर', 'कुलदीपक' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये मनमीतने केल्या आहेत भूमिका
  • मनमीत नवी मुंबईतील घारघर परिसरात होता वास्तव्यास 

नवी मुंबई: टीव्ही अभिनेता मनमीत ग्रेवाल याने गळास घेत आत्महत्या केली आहे. मनमीतने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. मनमीतच्या आत्महत्येनंतर त्याच्या मित्राने सांगितले की, त्याचा मृतदेह खाली उतरवण्याऐवजी नागरिक मोबाइलमध्ये व्हिडिओ शूट करत होते.

Spotboye सोबत बोलताना मनमीतचा मित्र मंजीत सिंह याने सांगितले की, 'ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी मनमीत अगदी नॉर्मल होता. तो आपल्या खोलीत गेला आणि दुपट्ट्याने गळफास घेतला'.

मनमीत हा नवी मुंबईतील खारघर परिसरात राहतो. ज्या दिवशी घटना घडली त्यावेळी त्याची पत्नी किचनमध्ये जेवण बनवत होती. मनमीत आपल्या खोलीत गेला आणि त्याने दुपट्ट्याच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. मनमीत याच्या खोलीतून जोरदार आवाज आल्याने त्याच्या पत्नीने बेडरूमकडे धाव घेतली. यावेळी मनमीतने गळफास घेतल्याचं दिसलं. पत्नीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकूण शेजारी सुद्धा घरात आले.

मनमीतचा मित्र मंजीत ने सांगितले की, 'मनमीतच्या पत्नीच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही. कोरोनाच्या भीतीने मनमीतला खाली उतरवण्यास कोणीही मदत केली नाही. आम्ही सांगितले की, त्याला कोरोना नाही झालेला तरीही कोणीही ऐकायला तयार नव्हतं. इतकच नाही तर नागरिक व्हिडिओ शूट करत होते. यानंतर एक व्यक्ती आला आणि त्याने दुपट्टा कापला मग मनमीतचा मृतदेह खाली उतरवला.जवळपास अडीच तासाने रुग्णवाहिका आली आणि मनमीतचा मृतदेह घेऊन गेले'.

या सीरिअल्समध्ये केलं आहे काम 

मनमीत ग्रेवाल याने टीव्ही शो 'आदत से मजबूर' आणि 'कुलदीपक' मध्ये भूमिका केल्या आहेत. तसेच सध्या विविध सीरिअल्समध्ये सुद्धा लहान-मोठ्या करुन तो आपला उदर्निवाह करत होता. कोरोनामुळे लॉडाऊन जाहीर करण्यात आला आहे आणि त्यामुळे सीरिअल्सचं शूटिंग सुद्धा रद्द करण्यात आले आहे.

लॉकडाऊनमुळे शूटिंग बंद झालं आहे परिणामी अनेक कलाकार बेरोजगार झाले आहेत. शूटिंग बंद झाल्यमुळे मनमीत याच्याकडे सुद्धा उत्पन्नाचं साधन उपलब्ध नव्हतं आणि तो त्रस्त होता. तसेच त्याच्यावर कर्ज सुद्धा होतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी