Siddhaanth Surryavanshi : टीव्ही जगताला आणखी एक धक्का, जिममध्ये वर्कआउट करताना 'कसौटी जिंदगी की' च्या अभिनेत्याचा मृत्यू

Siddhaanth Vir Surryavanshi Death: अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचे जिममध्ये वर्कआउट करत असताना निधन झाले आहे.

TV actor Siddhant Veer Suryavanshi died, fell during a workout in the gym
Siddhaanth Surryavanshi : टीव्ही जगताला आणखी एक धक्का, जिममध्ये वर्कआउट करताना 'कसौटी जिंदगी की' च्या अभिनेत्याचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • टीव्ही अभिनेता सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचे निधन
  • जिममध्ये वर्कआउट करताना पडला
  • सिद्धांतने अखेरचा श्वास घेतला.

मुंबई: टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धांत वीर सुर्यवंशी यांचे वयाच्या ४६ व्या वर्षी निधन झाले आहे. जिम वर्कआऊट करत हृदयविकाराचा झटका आल्याने सिध्दांत खाली पडला होता. त्यांच्या पश्चात पत्नी एलिशिया राऊत आणि दोन मुले असा परिवार आहे. वर्कआऊटदरम्यान स्टारचा हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक स्टार्ससोबत असे घडले आहे. (TV actor Siddhant Veer Suryavanshi died, fell during a workout in the gym)

अधिक वाचा : An Action Hero Trailer: आयुष्मान खुरानाच्या 'An Action Hero' सिनेमाचा ट्रेलर रिलीज, अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. पण तब्बल ४५ मिनिटानंतर डाॅक्टरांना वाचवण्यात अपयश आले. त्यानंतर सिध्दांतला मृत घोषित केले. ही बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर सर्वजण अभिनेत्याचे कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्तींचे सांत्वन करत आहेत. नुकतेच या अभिनेत्याने आपले नाव आनंद सूर्यवंशी वरून बदलून सिद्धांत सूर्यवंशी केले आहे.

अधिक वाचा : Sania Mirza-Shoaib Malik divorce: 'या' पाकिस्तानी अभिनेत्रीच्या एन्ट्रीमुळे झाला शोएब-सानियाचा घटस्फोट? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सिद्धांतने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. कुसुम या टीव्ही मालिकेतून तिने टीव्हीमध्ये पदार्पण केले. याशिवाय तो 'सुफियाना इश्क मेरा', 'जिद्दी दिल माने ना', 'वारीस', 'सात फेरे: सलोनी का सफर', 'कसौटी जिंदगी की' सारख्या शोचा भाग आहे. तो शेवटचा झी टीव्ही शो 'क्यू रिश्तों में कट्टी बट्टी' मध्ये दिसला होता.

यापूर्वी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, राजू श्रीवास्तव, दीपेश भान, सागर पांडे, अबीर गोस्वामी, साऊथ सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचा  फिटनेस फ्रीक होणाच्या नादात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी