[PHOTOS] कोरोना संकटादरम्यान सुरू झालंय मालिकांचं शूटिंग, बघा कसे काम करतायेत आवडते कलाकार

TV Shooting after Lockdown: शूटिंगसाठी आता कलाकार आणि क्रू मेंबर्स पुन्हा परतले आहेत. मालिकांचं शूटिंग पुन्हा सुरू झालंय. या दरम्यान योग्य ती काळजी घेत शूटिंग सुरू झाल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले

TV Showa shooting starts
कोरोना संकटादरम्यान सुरू झालंय मालिकांचं शूटिंग  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पुन्हा सुरू झालं मालिकांचं शूटिंग, कलाकार, क्रू परतले सेटवर
  • कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण काळजी घेत शूटिंग सुरू
  • कलाकार, क्रू सह सेटवरील सर्वांनीच घेतलीय विशेष काळजी, फोटोंमधून पाहा

मुंबई: खूप काळापासून लॉकडाऊनमुळे बंद असलेलं मालिकांचं शूटिंग (TV Serial) आता पुन्हा सुरू झालंय. त्यामुळे मालिकांमध्ये काम करणारे कलाकार (Actors) आणि इतर सर्व टीम घराबाहेर पडली आहे आणि शूटिंगचं (Shooting) काम सुरू केलंय. यासोबतच आता लोकांना त्यांच्या आवडत्या मालिका आणि कलाकार पुन्हा स्क्रीनवर पुन्हा एकदा दिसणार आहे. लॉकडाऊन (Lockdown) नंतर कोरोना व्हायरसपासून (Corona Virus) बचाव करण्यासाठी शूटिंगबाबत ही काही नियम बनवले गेलेले आहेत. त्यामुळे या नियमांचं पालन करत आणि योग्य ती काळजी घेत पुन्हा टीव्ही मालिकांचं शूटिंग केलं जात आहे. आपण काही फोटोंद्वारे कशाप्रकारे हे शूटिंग केलं जातंय ते पाहू शकतो.

TV Shows shooting in Pandemic Times

अभिनेत्री निया शर्मा, अपर्णा दीक्षित, ग्रेसी सिंह, अक्षित सुखीजा यांच्यासह इतर कलाकार तीन महिन्यांच्या लांबलचक ब्रेकनंतर आपल्या शूटिंगच्या पहिल्या दिवशी पोहोचले. काही जण सुरक्षा गियर सोबत दिसले तर शूटिंग क्रू चे लोकं आणि मेकअप आर्टिस्ट मास्क आणि पीपीई किट्स घालून दिसले.

TV Shows shooting in corona times

शूटिंगसाठी अभिनेत्यांना सेटवर बोलावण्यापूर्वी संपूर्ण सेट स्वच्छ केला गेला होता. संपूर्ण सेट सॅनिटाईज केला गेला आणि सोबतच प्रत्येक कोपऱ्यात पायानं सुरू होणारे सॅनिटर्स ठेवले गेले. तिथल्या स्पॉट बॉयना गरज पडल्यास ते वापरतांना पण शूटिंग काळात या फोटोंमध्ये बघितलं जावू शकतं.

TV Shows shooting in corona pandemic

‘ये जादू है जिन का’ आणि ‘ये है चाहते’ सारख्या मालिकांच्या प्रोमोची घोषणा केली गेली होती की, लवकरच नवीन एपिसोड प्रसारित केले जातील. ‘ये रिश्ता क्या कहलाता हे’चं शूटिंग पण पुन्हा सुरू झालंय. इथं निर्माते राजन शाही सोबत मोहसिन खानचा फोटो आपण बघू शकतो.TV Shows shooting

शूटिंगच्या सेटवर कडक सुरक्षेचं पालन केलं जात आहे आणि फक्त आवश्यक असलेल्या लोकांनाच आत जाण्याची परवानगी दिली जातेय. नवीन नियमांनुसार क्रू ला कोविड-१९ च्या पहिलेच्या स्थितीच्या तुलनेत ३३ टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे. मात्र यात सीनिअर सिटीझन सोडून इतर मुख्य कलाकारांचा समावेश नाहीय.

दरम्यान, आता हळुहळू टीव्ही सोबत चित्रपट सृष्टीपण कामाला लागणार आहे. हिंदी मालिकांसह आता मराठी मालिकांचं शूटिंग पण सुरू झालं आहे. प्रत्येक जण कोरोनापासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घेतांना दिसतोय.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी