देवमाणूस मालिकेत ट्विस्ट

झी मराठी चॅनलवर दिसणाऱ्या देवमाणूस या लोकप्रिय टीव्ही मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे.

twist in devmanus zee marathi tv serial
देवमाणूस मालिकेत ट्विस्ट 

थोडं पण कामाचं

  • देवमाणूस मालिकेत ट्विस्ट
  • नव्या चेहऱ्याची एन्ट्री होणार
  • परिस्थितीत बदल होणार

मुंबईः झी मराठी चॅनलवर दिसणाऱ्या देवमाणूस या लोकप्रिय टीव्ही मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे. चांगुलपणाचा बुरखा पांघरलेल्या देवीसिंग उर्फ डॉ. अजितकुमार देव याच्यावर पोलिसांनी गंभीर आरोप ठेवले आहेत. पण स्वतःच स्वतःची बाजू मांडत त्याने एकामागून एक आरोप खोडून काढण्याचा सपाटा लावला आहे. ठोस पुराव्यांच्या अभावी कोर्ट डॉ. अजितकुमार देव याची सुटका करण्याचा निकाल देणार आहे. नेमक्या याच टप्प्यावर मालिकेत ट्विस्ट येणार आहे. twist in devmanus zee marathi tv serial

देवमाणूस या लोकप्रिय टीव्ही मालिकेत एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री होणार आहे. चंदा ही व्यक्तीरेखा प्रेक्षकांसमोर येणार आहे. माधुरी पवार ही अभिनेत्री चंदा ही व्यक्तीरेखा साकारत आहे. 

डोळ्यासमोर अचानक चंदाचा चेहरा पाहून डॉ. अजितकुमार देव याची शुद्ध हरपते. अजितकुमारची निर्दोष सुटका होणार हे कळल्यामुळे चंदा गोंधळात पडते. आता चंदा आणि देवीसिंग उर्फ डॉ. अजितकुमार देव या दोघांचा काय संबंध आहे? हे पुढील भागांमधून उलगडणार आहे. मालिका रंजक वळणावर येणार आहे. चंदाच्या एन्ट्रीने परिस्थितीत काय बदल होणार? या प्रश्नाचे उत्तर मालिकेच्या पुढील भागांतून मिळेल. 

चंदा ही एक वेगळी व्यक्तीरेखा आहे. अशा पद्धतीची भूमिका साकरण्याचे दडपण माझ्यावर होते. पण मालिकेच्या टीमने सहकार्य केल्यामुळे हे आव्हान पेलले आहे, असे माधुरी पवार म्हणाली. माझी भूमिका प्रेक्षकांना आवडेल, असा विश्वास माधुरीने व्यक्त केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी