Taarak Mehtaशी संबंधित हे सत्य ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

मालिका-ए-रोज
Updated Nov 01, 2021 | 14:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेशी संबंधित असे अनेक फॅक्ट आहेत जे तुम्हाला कदाचित माहिती असतील. 

tarak mehta
Taarak Mehtaशी संबंधित हे सत्य ऐकून तुम्हीही व्हाल हैराण 
थोडं पण कामाचं
 • अय्यरची भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे सुरूवातीला 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेचे लेखक म्हणून होते.
 • दिलीप जोशींना सुरूवातीला जेठालाल आणि बापूजी या दोन्ही भूमिका साकारण्याची ऑफर मिळाली होती.
 • २०२०मध्ये तीन हजार एपिसोडचा टप्पा ओलांडणाऱ्या या मालिकेने दीर्घकाळापर्यंत चालणाऱ्या टीव्ही सिटकॉम होण्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला.

मुंबई: तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका घराघरात आवडीने पाहिली जाते. ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांनी चाहत्यांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे चाहत्यांना या मालिकेतील कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दलही जाणून घेण्याची उत्सुकता असते. या मालिकेची स्टारकास्ट खूप मोठीआहे. मालिकेतील सर्वच कलाकार खूप टॅलेंटेड आहेत. अभिनयाशिवाय ते विविध क्षेत्रांमध्ये निपुणही आहेत. unknown facts about Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

या मालिकेसंबंधीत असे काही खुलासे आहेत जे चाहत्यांना माहितीच नाही. हे खुलासे आज आम्ही या बातमीत करणार आहोत...

ही आहे लिस्ट

 1. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये दयाची भूमिका साकारणारी दिशा वाकानी आणि मालिकेतील त्यांचा भाऊ सुंदरची भूमिका साकारणारे मयुर वाकानी ऑनस्क्रीनच नव्हे तर रिअल लाईफमध्येही भाऊ-बहीण आहेत. 
 2. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये बापूजींची भूमिका साकारणारे अणित भट्ट हे आपला मुलगा जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी यांच्यापेक्षा वयांनी लहान आहेत तेही तब्बल सहा वर्षांनी
 3. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये आत्माराम भिडेची भूमिका साकारणारे मंदार चांदवाडकर रिअल लाईफमध्ये इंजीनियर आहेत. त्यांनी दुबईत इंजीनियरची नोकरी केली आहे. 
 4. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये टप्पूची भूमिका साकारलेले भव्य गांधी आणि गोगीची भूमिका साकारलेला समय शाह रिअल लाईफमध्ये चुलत भाऊ आहे. दरम्यान, भव्य गांधी आता या मालिकेत काम करत नाही. 
 5. अय्यरची भूमिका साकारणारे तनुज महाशब्दे सुरूवातीला 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेचे लेखक म्हणून होते. नंतर जेठालालच्या या शोमध्ये बंगाली-तामिळ कपलचा समावेश कऱण्याची आयडिया आली. यानंतर अय्यर या मालिकेचा भाग बनले. 
 6. दिलीप जोशींना सुरूवातीला जेठालाल आणि बापूजी या दोन्ही भूमिका साकारण्याची ऑफर मिळाली होती. त्यांच्यावर होते की कोणती भूमिका निवडायची. अशातच त्यांनी जेठालालची भूमिका स्वीकारली. 
 7. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मध्ये पोपटलाल यांचे जरी ऑनस्क्रीन लग्न झालेले नसले तरी रिअल लाईफमध्ये ते विवाहित आहेत आणि सोबतच तीन मुलांचे वडीलही. 
 8. २०२०मध्ये तीन हजार एपिसोडचा टप्पा ओलांडणाऱ्या या मालिकेने दीर्घकाळापर्यंत चालणाऱ्या टीव्ही सिटकॉम होण्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. या मालिकेचा पहिला एपिसोड २००८मध्ये टेलिकास्ट झाला होता. 

 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी