Bigg boss marathi 3 च्या घरात विकास पाटील “The MasterMind” टीम B आखत आहेत रणनीती

Bigg boss marathi 3 । बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून सुरू आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य. काल टीम A पूर्णपणे जणू मीरासाठीच खेळत होती की काय असा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडला असेलच

Vikas Patil “The MasterMind” Team B is strategizing in the house of Bigg boss marathi 3
विकास पाटील “The MasterMind” टीम B आखत आहेत रणनीती  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून सुरू आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य
  • मीनलची कॅप्टन बनण्याची इच्छा अपुरी राहिली
  • रामध्ये काल उमेदवारीचा सामना रंगला ज्यामध्ये अगदीच सहजरित्या मीरा जिंकली

Bigg boss marathi 3 । मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून सुरू आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य. काल टीम A पूर्णपणे जणू मीरासाठीच खेळत होती की काय असा प्रश्न प्रेक्षकांना देखील पडला असेलच. मीनलची कॅप्टन बनण्याची इच्छा अपुरी राहिली कारण, उमेदवारीमधून ती बाहेर पडली. आदिश आणि मीरामध्ये काल उमेदवारीचा सामना रंगला ज्यामध्ये अगदीच सहजरित्या मीरा जिंकली आणि ती ठरली कॅप्टन पदाची पहिली उमेदवार. आज टीम A म्हातारी बनणार असून Team B म्हणजेच विशाल, सोनाली..... प्राणी बनणार आहेत म्हणजेच या टीमला भोपळे लपवायचे आहेत. आणि विकास Team A मध्ये असल्याने तो Team B सोबत कार्याची रणनीति आखताना दिसणार आहे, अकारण कुठेतरी त्याला देखील कॅप्टन होण्याची इच्छा आहे. (Vikas Patil is “The MasterMind” of Team B, strategizing in the house of Bigg boss marathi 3)


 
विकासचे म्हणणे आहे, “ दुसर्‍या राऊंडला आजीचे गाठोडे आहे ना ते उघडायचे आणि त्याच्यामध्ये भोपळा ठेवायचा, काल आम्ही पहिले ते उघडून... भोपळा ठेवला की, परत गाठोड आहे तिथे ठेवायचे. मी येणार डायरेक्ट गाठोड घेऊनच आत येणार. तिघांना बाहेर काढायचे आहे. विशाल तुझं पहिलं काम जिथे जयचा टाकशील तिथे उत्कर्षचा टाकशील आणि तिथेच दादूसचा पण टाकशील. आपल्याला हे तीन लोकं बाहेर काढायची आहेत. हे तीन एकदा बाहेर गेले की मग ... पुढे मग खेळवा तुम्ही सगळ्यांना. कारणं तेव्हा फक्त मुली रहातील. काल जे ते करत होते ना, आपल्याला तितकं नाही करायचे पण... आणि पुढे अजून काही योजना आखल्या गेल्या. बघूया कोण बाजी मारते ते आजच्या भागामध्ये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी