Bigg Boss Marathi Season 4: 'बिग बॉस मराठी 4'चा प्रीमियर ऑनलाइन कुठे, कधी आणि कोणत्या Apps वर पाहाल

Bigg Boss marathi season 4 premiere: बिग बॉस मराठीचा चौथ्या सीझनचा प्रीमिअर (Bigg Boss marathi season 4 premiere) 2 ऑक्टोबरला होणार आहे. 2 तारखेपासून पुढील 3 महिने म्हणजेच तब्बल 100 दिवस हा खेळ रंगणार आहे. प्रेक्षकांमध्येही या सीझनसाठी कमालीची उत्सुकता आहे.

voot app sony live bigg boss marathi season 4  premiere watch live online
आता 'बिग बॉस मराठी सीझन 4'चा प्रीमियर पाहा ऑनलाईन  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • स्मॉल स्क्रीनवरील सर्वात लोकप्रिय असलेला शो बिग बॉस मराठी नव्या म्हणजेच चौथ्या सीझनसह परतला आहे.
  • बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनचा प्रीमियर 2 ऑक्टोबर रोजी होणार
  • आधीच्या तीन सीझनप्रमाणेच यंदाचा सीझनही महेश मांजरेकर होस्ट करणार

Bigg Boss Marathi : स्मॉल स्क्रीनवरील सर्वात लोकप्रिय, टीका होणारा तसेच सर्वात जास्त पाहिला जाणारा आणि चर्चेत असलेला शो, बिग बॉस मराठी नव्या म्हणजेच चौथ्या सीझनसह (Bigg Boss marathi season 4 ) परतला आहे. 2 ऑक्टोबरला या सीझनचा प्रीमियर (Bigg Boss marathi season 4 premiere) होणार आहे. पुढील 3 महिने म्हणजेच तब्बल 100 दिवस हा खेळ रंगणार आहे. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या टेलिकास्टच्यावेळी रस्त्यांवर शुकशुकाट असेल असं म्हटलं तर वावगं वाटू नये. (voot app sony live bigg boss marathi season 4  premiere watch live online)


बिग बॉस मराठी सीझन 4 

बिग बॉस मराठीची यंदाची थीम आहे 'ALL IS WELL' त्यामुळे यंदा महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेणार पण जरा हटके स्टाईलने असं प्रोमोमध्ये आपल्याला दिसत आहे. 100 दिवसांच्या या खेळात, कधी पास, कधी फेल. मात्र, महेश मांजरेकर म्हणतायेत, यंदा 'All is well'. सोशल मीडियावर सर्व अपडेट्स शेअर करत चाहत्यांमध्ये उत्साह वाढवण्यातसाठी निर्माते कोणतीही कसर सोडत नाहीयेत. 

 

अधिक वाचा : Navratri 9 colors 2022: उद्याचा रंग- (केशरी), द्या शुभेच्छा


बिग बॉस मराठी सीझन 4 कधी पाहता येईल? (When to watch Bigg Boss Marathi 4)


बिग बॉस मराठी सीझन 4 सोमवार ते शुक्रवारी रात्री 10 वाजता टीव्हीवर पाहू शकतात. वीकेंडला रात्री 9.30 वाजता बिग बॉस मराठी सीझन 4 प्रसारित होणार आहे. शो आधी स्ट्रीम होत असल्याने, तुम्ही आदल्या दिवशी रात्री 9.30 वाजता आणि वीकेण्डला रात्री 9 वाजता तो ऑनलाइन पाहू शकता.


बिग बॉस मराठी सीझन 4 कुठे पाहता येइल? (Where to watch Bigg Boss Marathi 4)

'बिग बॉस मराठी सीझन 4 ' कलर्स मराठीवर दररोज रात्री 10 वाजता पाहता येईल. तर वीकेण्डला रात्री 9.30 वा. प्रसारित होईल. OTT जायंट Voot वर देखील पाहता येऊ शकते. 

बिग बॉस मराठी सीझन 4 चे स्पर्धक (Bigg Boss Marathi contestants)

बिग बॉस मराठी सीझन 4 मध्ये कोणते कलाकार हजेरी लावणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, तरीही सोशल मीडियावर अनेक कलाकारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. स्मॉल स्क्रीनवरचा नायक समीर परांजपे, अभिनेत्री सायली संजीव, हार्दिक जोशी, नेहा खान, शर्वरी लोहकरे, अपूर्वा नेमळेकर, किरण माने अशी अनेक नावं चर्चेत आहेत. मात्र, प्रत्यक्षात बिग बॉसच्या घरात कोण एन्ट्री घेणार यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. 

अधिक वाचा : महात्मा गांधी जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे मराठीतून विचार

वीकेण्डला रंगणार महेश सरांची शाळा (Weekend Show)

सोमवार ते शुक्रवार घरात राडा, घराचा आखाडा, वाद, भांडण सारं काही झाल्यावर अखेर आठवड्याच्या शेवटी या सगळ्याचा हिशोब स्पर्धकांना चुकता करावा लागणार आहे. कारण, महेश मांजरेकरांची शाळा आठवड्याच्या शेवटी म्हणजेच शनिवार आणि रविवारी रंगणार आहे. 'कितीही सांगितलं तरी घराचा आखाडा व्हायला वेळ लागत नाही, पण समजा कोणी कोणाची टांग खेचली तर समजा शिट्टी वाजली.' असं खुद्द महेश मांजरेकरांनीच म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी