Netflix वर रिलीज होण्यापूर्वी या ठिकाणी पाहू शकतात, तुम्ही 'सेक्रेड गेम्स २' जाणून घ्या संपूर्ण बातमी 

मालिका-ए-रोज
Updated Aug 12, 2019 | 19:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

नेटीझन्स आतुरतेने ज्या वेबसिरीजची वाट पाहत असलेल्या ती आता येत्या १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सेक्रेड गेम्स २ (Sacred Games 2) या स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार आहे.

sacred games session 2
सेक्रेड गेम्स (सौजन्य - नेटफ्लिक्स) 

थोडं पण कामाचं

  • सेक्रेड गेम्स सीझन २ ची प्रतिक्षा संपणार १५ ऑगस्ट रोजी 
  • पण काही खास व्यक्ती ही सिरीज Netflix वर रिलीज होण्यापूर्वी पाहू शकणार आहेत. 
  • आपली मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषही दिसणार आहे दुसऱ्या सिरीजमध्ये

मुंबई : नेटीझन्स आतुरतेने ज्या वेबसिरीजची वाट पाहत असलेल्या ती आता येत्या १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सेक्रेड गेम्स २ (Sacred Games 2) या स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार आहे. पण असे काही लोक असणार आहे. त्यांना १५ ऑगस्टची वाट पाहण्याची गरज नाही. अशात वन प्लस स्मार्टफोन युजर्ससाठी एक खास खुशखबर आहे. कंपनीने शनिवारी घोषणा केली की हा शो वनप्लस स्मार्ट फोन युजर्स शो रिलीज होण्याच्या एक दिवस अगोदर पाहू शकणार आहेत. 

वनप्लस कम्युनिटी सदस्यांनी मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू येथे स्पेशल स्क्रिनिंगसाठी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. त्यानंतर ते अनुराग कश्यप दिग्दर्शीत सिरीजचा पहिला एपिसोड पाहू शकणार आहे. वन प्लसने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले की, स्क्रिनिंग १४ ऑगस्टला होणार आहे. तिकीट आज दुपारी १२ नंतर मिळणार आहेत. 

वन प्लस इंडियाचे जनरल मॅनेजर विकास अग्रवाल यांनी सांगितले की, आम्ही नेटफिक्ससोबत आपली भागिदारीची घोषणा केली आहे. आम्ही आमच्या कम्युनिटीतील लोकांसाठी काही खास आणि वेगळे करण्याची प्लानिंग केली आहे. त्यामुळे आम्ही आपल्या एचडीआर सपोर्टेड डिसप्लेसोबत वन प्लस ७ प्रो वर त्यांना एक खास अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

त्यांनी पुढे सांगितले की, आम्ही आमच्या कम्युनिटीला एक खास अनुभव देणार आहोत. या उपक्रमाबाबत आम्ही खूप खुश आहोत. 

सैफ अली खान या सिरीजमध्ये सरताज सिंगच्या भूमिकेत आहे. तर नवाजुद्दीन सिद्दीकी गणेश गायतोंडेच्या भूमिकेत आहे. या वेळी सेक्रेड गेम्स २ मध्ये पंकज त्रिपाठी ही दिसणार आहे.  तो या सिरीजमध्ये गुरूजीच्या भूमिकेत दिसणार आहे. रणवीस शौरी आणि कल्की कोचलिनही या वेबसीरीजचा भाग आहे. कल्की बात्या च्या भूमिकेत असणार आहे. तर आपली मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाषही दिसणार आहे. मागील सिरीजमध्ये जितेंद्र जोशी आणि राधिका आपटे यांची प्रमुख भूमिका होती. 

सेक्रेड गेम्सचा पहिला सिझन खूप लोकप्रिय झाला होता. त्यातील डायलॉग आणि सीन लोकांचे तोंडपाठ झाले होते. तसेच त्यातील स्टार कास्ट खूप प्रसिद्ध झाली होती. गणेश गायतोंडे हे कॅरेक्टर खूप लोकप्रिय झाले होते. त्यामुळे नवाजुद्दीन सिद्दीकीला नवी ओळख मिळाली होती. सैफ अली खान याचीही भूमिका अत्यंत उत्कृष्ठ झाली होती. नेटफिक्सवरील ही सिरीज जेव्हा संपली तेव्हाच त्याचा दुसरा सिझन येणार होता, हे सांगण्यात आले होते. पण तो कधी येणार हे कळत नव्हते. त्यामुळे अनेक नेटीझन्सची उत्सुकता ताणली गेली होती. आता या सिरीजचा दुसरा भाग १५ ऑगस्ट रोजी रिलीज होणार असल्याने सर्व नेटिझन्स ज्यांनी याची पहिली सिरीज पाहिली होती. ते आतुरतेने दुसऱ्या सिरीजची वाट पाहत आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
Netflix वर रिलीज होण्यापूर्वी या ठिकाणी पाहू शकतात, तुम्ही 'सेक्रेड गेम्स २' जाणून घ्या संपूर्ण बातमी  Description: नेटीझन्स आतुरतेने ज्या वेबसिरीजची वाट पाहत असलेल्या ती आता येत्या १५ ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. सेक्रेड गेम्स २ (Sacred Games 2) या स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...