जे घडणार तेच ती बोलणार "सातव्या मुलीची सातवी मुलगी", नवीन मालिकेतून समजणार भविष्यात घडणाऱ्या घटना

झी मराठीवर (Zee Marathi) एका पाठोपाठ एक नव्या मालिका सुरू होत आहेत. सातव्या मुलीची सातवी मुलगी (Satvya Mulichi Seventh Mulgi) ही नवी मालिका (series) लवकरच सुरू होणार आहे. सातव्या मुलीची सातवी गोष्ट ही मालिका अद्भुत शक्तीवर आधारित आहे. १२ सप्टेंबर पासून रात्री. १०.३० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे.

New Serial on zee marathi  satvya mulichi satavi mulagi
सर्वांच्या भविष्यात घडणारी गोष्ट नेत्राला दिसणार  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सातव्या मुलीची सातवी मुलगी नवी मालिका
  • तितिक्षा तावडे मुख्य भूमिकेत
  • अद्भुत शक्तीवर आधारित आहे नवी मालिका

मुंबई :  झी मराठीवर (Zee Marathi) एका पाठोपाठ एक नव्या मालिका सुरू होत आहेत. सातव्या मुलीची सातवी मुलगी (Satvya Mulichi Seventh Mulgi) ही नवी मालिका (series) लवकरच सुरू होणार आहे. सातव्या मुलीची सातवी गोष्ट ही मालिका अद्भुत शक्तीवर आधारित आहे. १२ सप्टेंबर पासून रात्री. १०.३० वाजता ही मालिका प्रसारित होणार आहे. नवीन एका विषय असलेल्या या मालिकेमुळे वाहिनीचा टीआरपी परत एकदा वरती जाणार असल्याची आशा आहे. 

'सरस्वती' मालिकेतील प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे तितिक्षा तावडे सातव्या मुलीची सातवी गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तितिक्षा तावडे ही मुख्य भूमिकेत असणार असून नुकताच मालिकेचा पहिला प्रोमो समोर आला आहे. तितिक्षाची फारच वेगळी भूमिका मालिकेत पाहायला मिळत आहे.

तावडेसह अजिंक्य ननावरे हेही प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसंच या मालिकेत ऐश्वर्या नारकर, मुग्धा गोडबोले,रजनी वेलणकर, अजिंक्य जोशी, जयंत घाटे, राहुल मेहेंदळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील. किरण बिडकर आणि अभिराम रामदासी हे या मालिकेचे लेखक आहेत. तर आयरिस Production (विद्याधर पाठारे) यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. 

Read Also : एकनाथ शिंदे प्रकरणात मतदारांच्या वतीने हस्तक्षेप याचिका

आपल्याला नेहमीच भविष्यकाळात काय घडणार या विषयी कुतूहल असतं आणि भविष्य आपल्याला दिसू लागलं तर त्याचं आश्चर्यच वाटेल. अगदी असंच सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या आयुष्यात घडलंय. नेत्रा भविष्यात जे घडणार आहे, त्याबद्दल बोलते. पण लोक तिला समजून न घेता तिच्यावर दोषारोप करतात, त्यामुळे नेत्राला प्रत्येक वेळी नव्या आव्हानाला सामोरं जावं लागतं. अशा या नेत्राची गोष्ट लवकरच झी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

Read Also : दुर्मिळ पण घातक स्क्रब टायफस आजाराचा राज्यात शिरकाव

नेत्राला साक्षात त्रिनयना देवीनेच भविष्य पाहू शकण्याचं वरदान दिलंय. नेत्राला तिच्याकडील या दिव्यशक्तीचा वापर समाजाच्या भल्यासाठी करायचा आहे. परंतु तिला भविष्य दिसत असलं तरी तिचं आयुष्य सोपं नाही. तिला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं. अशी ही नेत्रा वर्तमानातील आयुष्य जगताना भविष्याचा वेध कसा घेते, हे पाहणं उत्कंठा वाढवणारं असणार आहे. या मालिकेचं सादरीकरण गूढ रहस्यमय पद्धतीने करण्यात येणार असून मानवी भावभावनांचे, नातेसंबंधांचे अनोखे पैलू यात उलगडले जाणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी