हिंदी बिग बॉस 16 मध्ये ताजिकिस्तानचा गायक सहभागी होणार?

Who is Abdu Rozik  Bigg Boss 16 first confirmed contestant : लवकरच सुरू होणार असलेल्या हिंदी बिग बॉस 16 मध्ये यंदा एक परदेशी गायक सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. ताजिकिस्तान या देशातील एक गायक यंदा हिंदी बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे.

Who is Abdu Rozik  Bigg Boss 16 first confirmed contestant
हिंदी बिग बॉस 16 मध्ये ताजिकिस्तानचा गायक सहभागी होणार?  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • लवकरच सुरू होणार असलेल्या हिंदी बिग बॉस 16 मध्ये यंदा एक परदेशी गायक सहभागी होणार
  • ताजिकिस्तान या देशातील एक गायक यंदा हिंदी बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार
  • जाणून घ्या या गायकाविषयी...

Who is Abdu Rozik  Bigg Boss 16 first confirmed contestant : लवकरच सुरू होणार असलेल्या हिंदी बिग बॉस 16 मध्ये यंदा एक परदेशी गायक सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे. ताजिकिस्तान या देशातील एक गायक यंदा हिंदी बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणार असल्याचे वृत्त आहे.

दिसायला गोंडस लहानग्यासारखा असलेला हा 19 वर्षांचा ताजिकिस्तानचा गायक बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहे. या गायकाचे नाव आहे अब्दु रोझिक (abdu rozik). ताजिकिस्तानचा हा गायक रॅपर म्हणून प्रसिद्ध आहे. 

अब्दुचा अवलोड मीडिया (Avlod Media) नावाचा यू ट्यु चॅनल आहे. या चॅनलचे 580 हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. लवकरच अब्दु रोझिक सलमान खानच्या किसी का भाई किसी की जान या हिंदी सिनेमात दिसणार आहे.

या आठ डिश खाल तर Non Veg ला कराल राम राम

सेम टू सेम सुपरहिट डुप्लीकेट!

काही दिवसांपूर्वी अब्दु आणि हसबुल्ला यांच्या भांडणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या निमित्ताने कमी उंचीची माणसं पण चमकदार कामगिरीच्या जोरावर लोकप्रिय होऊ शकतात हे दिसलं होतं. 

इथे आहे अनोखा खजिना

बघाल तर बघतच राहाल

काही यू ट्युब चॅनलनी दिलेल्या माहितीनुसार बालपणी रिकेट्स हा हाडे कमकुवत करणारा आजार झाल्यामुळे अब्दु रोझिक याची उंची जास्त वाढली नाही. याच कारणामुळे 19 वर्षांचा असूनही अब्दु रोझिक चिमुरड्यासारखा दिसतो. पण या माहितीला अब्दुकडून अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.

प्राथमिक वृत्तानुसार हिंदी बिग बॉस 16 या रिअॅलिटी टीव्ही शो मध्ये अब्दु रोझिक हा पहिल्या क्रमांकाचा स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. यंदा हिंदी बिग बॉस 16 हा रिअॅलिटी टीव्ही शो शनिवार 1 ऑक्टोबर 2022 पासून तर मराठी बिग बॉस 4 हा रिअॅलिटी टीव्ही शो रविवार 2 ऑक्टोबर 2022 पासून सुरू होणार आहे. हिंदी बिग बॉस कलर्स हिंदी (कलर्स) या टीव्ही चॅनलवर तर  मराठी बिग बॉस कलर्स मराठी या टीव्ही चॅनलवर दिसणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी