Bigg Boss 16 Winner MC Stan : ऑक्टोबर 1, 2022 रोजी सुरू झालेलं बिग बॉस 16 चं पर्व 12 फेब्रुवारी 2023 रोजी संपलं असून या 19 आठवड्यांच्या दीर्घ पर्वाला नवा विजेता मिळाला. पुणेकर रॅपर एमसी स्टॅन 'बिग बॉस 16' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. एमसी स्टॅनचं (Bigg Boss 16 Winner MC Stan) खरं नाव अल्ताफ शेख (Altaf Shaikh) असं आहे. सलमान खान याने एमसी स्टॅन याला बिग बॉसची ट्रॉफी दिली. हिरे आणि सोन्यापासून ही ट्रॉफी बनवण्यात आलेली आहे. या ट्रॉफीची किंमत 9 लाख 34 हजार आहे. या ट्रॉफीवर हिऱ्यांचे सुंदर काम करण्यात आले आहे. ही अत्यंत खास ट्रॉफी आहे. (Who is MC Stan who is the winner of Bigg Boss 16? Know the story of the Bigg Boss Winner Rapper)
अधिक वाचा : WhatsApp,imagesने द्या Kiss Day च्या शुभेच्छा
फिनाले सुरू होताच काहीच तासात आधी शालीन आणि त्यानंतर अर्चना घराबाहेर पडले. त्यानंतर विजेतेपदाचा महत्त्वाचा दावेदार असणाऱ्या प्रियंकाला घराबाहेर जावे लागले. ती विजेता होईल असे लाखो चाहत्यांना वाटत होते, वोटिंग ट्रेंडही तिच्या बाजुने होते. मात्र बिग बॉसच्या ट्रॉफीवर स्टॅनच्या नावाचा शिक्का लागला. तर त्याचा मित्र मराठमोळ्या शिव ठाकरेला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. लोकप्रिय रॅपर एमसी स्टॅन याने बिग बॉस 16 मधून अधिक लोकप्रियता मिळवली. त्याच्या बोलण्याची स्टाइल अनेकांना भावली.
अधिक वाचा : तुमच्या प्रेमाला या सुंदर वॉलपेपरसह पाठवा खास massage
गेल्या काही दिवसांत त्याचा खेळही सुधारला होता. बिग बॉस 16 च्या घरात एन्ट्री केली आणि एन्ट्रीसोबतच स्टॅनने होस्ट सलमान खानचे मन जिंकले. एमसी स्टॅनच्या संघर्षापासून यशापर्यंतची कहाणी ऐकल्यानंतर सलमान खानने त्याचे कौतुक केले होते. सलमानने एमसी स्टॅनचे कौतुक करत मला त्याचा अभिमान असल्याचे म्हटलं होते. असा बिग बॉस 16 चा विजेता ठरलेला एमसी स्टॅन आहे तरी कोण हे जाणून घेण्याची इच्छा अनेकांना आहे. आपण आज ते जाणून घेऊया.
पुणेकर असलेल्या स्टॅनला बालपणीच संगीताची गोडी लागली. त्याने लोकप्रिय रॅपर रफ्तारसोबतही गाणं गायलं आहे. पण 'वाता' या गाण्यामुळे तो तरुणांमध्ये लोकप्रिय झाला. या गाण्याला युट्यूबवर 21 मिलियन व्हू्यूज मिळाले आहेत.
23 वर्षीय एमसी स्टॅन कोट्यवधींचा मालक आहे. गाणी, युट्यूब आणि कॉन्सर्टच्या माध्यमातून तो दर महिन्याला लाखो रुपये कमावतो. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या एमसीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. कुटुंबियांनीदेखील त्याला त्याच्या गाण्यांमुळे टोमणे मारले. पण तरीही त्याने त्याची आवड जोपासली. आज त्याची गाणी लोकप्रिय झाली असून तो सध्या एक प्रसिद्ध रॅपर आहे.
एमसी स्टॅनने वयाच्या 12 व्या वर्षी कव्वालीच्या माध्यमातून संगीतक्षेत्रात पदार्पण केलं. तसेच 'समझ मेरी बात को' या गाण्याच्या माध्यमातून त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर त्याचे 'अस्तगफिरुल्ला' (Astaghfirullah) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्याच्या माध्यमातून त्याने त्याचा संघर्ष, आयुष्यात आलेल्या आर्थिक अडचणी आणि भूतकाळावर भाष्य केलं. 'तडीपार' या अल्बममुळे एमसी स्टॅन लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला.
अधिक वाचा : Happy Kiss Day Shayari: शायरी करत करा प्रपोज;लाजत देईल होकार
एमसी स्टॅनचा जन्म पुण्यातील अत्यंत गरीब मुस्लिम कुटुंबात झाला. सुरुवातीला त्याला कुटुंब आणि लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले कारण स्टॅन अभ्यासापेक्षा गाण्यावर आणि रॅपकडे जास्त लक्ष देत असायचा. एक काळ असा होता की स्टॅनकडे पैसे नव्हते आणि त्यामुळे त्याला रस्त्यावर रात्र काढावी लागल्या होत्या. पण एमसी स्टॅनने हार न मानता यशाचे शिखर गाठले आहे. जे पूर्वी एमसी स्टॅनकडे तिरस्काराने बघायचे, ते आज स्टॅनचे कौतुक करताना थकत नाहीत.
एमसी स्टॅनने 'समझ मेरी बात को' या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली, ज्यामध्ये त्याने DIVINE आणि EMIWAY सारख्या गायकांना पिछाडलं होतं. याच कारणामुळे एमसी स्टॅन लोकांच्या निशाण्यावर आले. नंतर, एमसी स्टॅनने अस्तगफिरुल्ला नावाचे एक गाणे रिलीज केले, ज्यामध्ये त्याने आपला संघर्ष, आर्थिक अडचणी आणि भूतकाळात झालेल्या चुकांबद्दल सांगितले. या गाण्याने एमसी स्टॅनबद्दल लोकांचा समज बदलला.
एमसी स्टॅनवर काही महिन्यांपूर्वी प्रचंड टीका झाली होती. त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने म्हणजे औझमा शेखने त्याच्यावर आरोप केले होते. या आरोपात ती म्हणाली होती,"एमसी स्टॅनने माझ्या मॅनेजरला मला मारहाण करण्यास सांगितले आहे". या आरोपांचा एमसी स्टॅनच्या इमेजवर परिणाम झाला होता. त्यामुळेच त्याने बिग बॉसचा खेळ खेळण्याचं ठरवलं.एमसी स्टॅन एक रॅपर म्हणून लोकप्रिय असण्यासोबत त्याचे नेकपीस आणि शूजदेखील चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. 'बिग बॉस 16'च्या प्रीमियरला तो 70 लाख किंमत असलेला नेकपीस आणि 80 हजार रुपयांचा शूज घालून आला होता.