Bigg Boss Marathi च्या  घरात कोण होणार पुढील आठवड्याचा कॅप्टन ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेले “जिंकू किंवा लढू” हे साप्ताहिक कार्य काल संपले. या साप्ताहिक कार्यामध्ये टीम A विजयी ठरली. नियमांनुसार या विजेत्या टीमच्या सदस्यांना आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळणार आहे.

Who will be next week's captain in Bigg Boss Marathi's house?
Bigg Boss घरात कोण होणार पुढील आठवड्याचा कॅप्टन ? 

थोडं पण कामाचं

  • बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस पंधरावा !
  • टीम B ला मिळाली सुवर्णसंधी !
  • बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार “डान्स पे चान्स” हे कॅप्टन्सी कार्य !

मुंबई  : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेले “जिंकू किंवा लढू” हे साप्ताहिक कार्य काल संपले. या साप्ताहिक कार्यामध्ये टीम A विजयी ठरली. नियमांनुसार या विजेत्या टीमच्या सदस्यांना आठवड्यातील कॅप्टन पदाची उमेदवारी मिळणार आहे. बिग बॉस यांनी घोषित केले या टीममधील सदस्यांनी विचारविनिमय करून दोन सदस्यांची नावे कॅप्टन्सीसाठी द्यावी. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कॅप्टनशीप सोबतच खूप मोठी जबाबदारी देखील येते. आता कॅप्टन बनण्याचा बहुमान कोणाला मिळणार हे आज कळेलच. टीम A मधील सदस्यांनी या विषयावर चर्चा करण्यास काल सुरूवात केली.

प्रत्येक सदस्य आपण कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी कसे योग्य आहेत आणि त्यांना इच्छा आहे त्यांनाच उमेदवारी मिळावी हे स्पष्ट करू लागले. जयचे म्हणणे होते मला उमेदवारी मिळाली पाहिजे, मीराने सांगितले मी माझंच नावं पुढे करेन, विशालचे म्हणणे होते कॅप्टन म्हणून मला निवडाव अशी विनंती आहे. पण नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये बिग बॉस यांनी जाहीर केले आहे टीम A एकमताने निर्णय घेण्यास असमर्थ ठरली आहे त्यामुळे आता ही संधी टीम B ला मिळत आहे. टीम B ला ही सुवर्णसंधीच मिळाली आहे.


 
आता टीम B या संधीचा कसा योग्यपणे वापर करेल ? कोणत्या दोन सदस्यांची नावे पुढे येतील ?  कोण बनेल पुढच्या आठवड्याचा कॅप्टन ?

 याचसोबत टीम A मधील सदस्यांची चर्चा बघायला मिळणार आहे कॅप्टन्सी टास्कसाठीच्या उमेदवारीसाठी. ज्यामध्ये जय त्याचा मुद्दा मांडताना दिसणार आहे, “आपण जर असे वाद करणार असू तर आपण जे आता म्हणतो आहे की मी समजूतदार वैगरे तर आपण बाहेरच्या सहा जणांना कसे सांभाळणार ?

बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार “डान्स पे चान्स” हे कॅप्टन्सी कार्य !

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज रंगणार आहे “डान्स पे चान्स” हे कॅप्टन्सी कार्य. पुढील आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराचा कॅप्टन कोण बनणार हे आजच्या भागामध्ये कळणार आहे. सदस्यांनी या कार्यासाठी एकसे बडकर एक असे गेटअप केले आहेत. सुरेखा कुडची  - अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस) – आविष्कार दारव्हेकर, मीनल शाह – गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे - सोनाली पाटील, मीरा जगन्नाथ – तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ – विकास पाटील या जोड्या असणार आहेत. आता यांनी कोणत्या गाण्यांवर डान्स केला, कोण बनला घराचा नवा कॅप्टन कळणार आहे आज. दादुस आणि आविष्कार यांनी पार्टनर चित्रपटातल्या गाण्यावर धम्माल डान्स केला. आविष्कार आणि दादूर बनले बिग बॉस मराठीच्या घरातले सलमान खान आणि गोविंदा. घरातील सदस्यांनी बघूया अजून काय काय धम्माल केली.
 
याचसोबत टीम A मधील सदस्यांची चर्चा बघायला मिळणार आहे कॅप्टन्सी टास्कसाठीच्या उमेदवारीसाठी. ज्यामध्ये जय त्याचा मुद्दा मांडताना दिसणार आहे, “आपण जर असे वाद करणार असू तर आपण जे आता म्हणतो आहे की मी समजूतदार वैगरे तर आपण बाहेरच्या सहा जणांना कसे सांभाळणार ?
 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी