Big bOss marathi 3 : बिग बॉसच्या घरातून कोण घेणार निरोप? कोण होणार एलिमिनेट?

मालिका-ए-रोज
Updated Dec 12, 2021 | 19:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Big bOss marathi 3 update: बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. गेल्या आठवड्यात एलिमिनेशन झाले नाही, त्यामुळे आता आज कोण जाणार आणि कोण राहणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Who will say goodbye to Bigg Boss's house? Who will be eliminated?
बिग बॉसच्या घरातून कोण जाणार याची उत्सुकता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हुकुमशाहांनी गाजवला बिग बॉस मराठीचा हा आठवडा
  • बिग बॉसच्या घरातून कोण निरोप घेणार? कोण होणार एलिमिनेट?
  • बिग बॉस मराठी सिझन 3 ला आज मिळणार टॉप 7 सदस्य

Big Boss marathi 3 elimination: बिग बॉस मराठी 3 हळूहळु अंतिम टप्प्याकडे वाटचाल करतोय. आता बिग बॉसच्याळे 
घरात उरलेत फक्त 8 सदस्य. त्यामुळे या आठवड्यात कोण बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार? कोण राहणार? याची उत्सुकता वाढलीय. 
या आठवड्यात बिग ब़ॉस मराठीच्या सिझन 3 चा शेवटचा कॅप्टन्सी टास्क पार पडला. मीनल शाह या आठवड्यात कॅप्टन झाली आहे. 
तर दुसरीकडे, हा आठवडा गाजवला तो बिग बॉसच्या घरात आलेल्या पाहुण्यांनी. आदिश वैद्य, स्नेहा वाघ आणि तृप्ती देसाई यांनी 
पुन्हा एकदा दणक्यात घरात एन्ट्री घेतली. हुकुमशाहांनी बिग बॉसचं घर पुरतं दणाणून सोडलं. मग कधी एकमेकांवरची खुन्नस निघाली
तर कधी आपल्या माणसांसाठी प्रेमही. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनेक रंग पाहायला मिळाले.

प्रेम, राग, द्वेष, बदला, अशा अनेक भावना बिग बॉसच्या घरात पाहायला मिळाल्या. जसजसे आठवडे पुढे जात आहेत तसतसा हा शो अधिक रंजक 
होत आहे. 


या आठवड्यात जय दुधाणे, सोनाली पाटील आणि गायत्री दातार डेंजर झोनमध्ये आहेत. त्यामुळे आता या तिघांमधून कोणाचा प्रवास इथेच संपणार? कोण जाणार? कोण राहणार? 

एकूणंच काय तर बिग बॉस मराठीच्या सिझन 3 मध्ये आता खऱ्या अर्थाने रंगत आलीय. आतापर्यंत एकमेकांसाठी खेळणारे हे स्पर्धक आता पुढे कोणती नवी खेळी खेळणार? बिग बॉस आणखी काय नवीन सरप्राईजेस या सदस्यांना देणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी