Big Boss marathi 3 elimination: बिग बॉस मराठी 3 चा ग्रॅण्ड फिनाले आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. आता बिग बॉसच्या घरात उरलेत फक्त 6 सदस्य. त्यातच कोणाच्याही ध्यानीमनी नसताना आज बिग बॉसच्या घरातील शेवटचे एलिमिनेशन होणार आहे. त्यामुळे मीनल, विकास, जय, उत्कर्ष आणि मीरा यांच्यापैकी कोण बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार? फिनालेमध्ये जाण्याचं कोणाचं स्वप्न भंग पावणार ते आज कळेल. तर दुसरीकडे, तिकीट टू फिनाले जिंकत विशाल निकम फिनालेमध्ये याआधीच पोहोचलाय.
या आठवड्यात स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरातील आतापर्यंतच्या प्रवासातल्या आठवणींना उजाळा दिला. या आठवड्यात कोणतेही भांडण, एकमेकांची उणीदुणी सदस्यांनी काढली नाहीत.
एकूणंच काय तर बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल हे अनाकलनीय आहे. सारेच स्पर्धक एकापेक्षा एक सरस असल्याने आता कोण जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणते स्पर्धक फिनालेमध्ये दाखल होणार ते लवकरच कळेल.