Bigg Boss 16:MC Stan viral,Will Shiv Thackeray leave the Bigg Boss trophy? : मुंबई : बिग बॉस 16 च्या सदस्यांना मीडियाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. शिव ठाकरे आणि त्याच्या फ्रेंड सर्कलच्या (मंडली) मुद्यावर मीडियाने काही प्रश्न उपस्थित केले. थेट शिव ठाकरे यालाच मीडियाने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शिव ठाकरे वारंवार व्हिक्टिम कार्ड खेळतो. तो स्वतःच्या फ्रेंड सर्कलच्या हितांना प्राधान्य देतो असा दावा करतो. मग एमसी स्टॅन साठी शिव ठाकरे बिग बॉस 16 मधून बाहेर पडणार का, असा प्रश्न मीडियाकडून उपस्थित करण्यात आला.
मीडियाच्या प्रश्नांना उत्तर देताना शिव ठाकरेने त्याच्या बुद्धिचातुर्याची चुणूक दाखवून दिली, बिग बॉस मध्ये सर्व जण ट्रॉफी जिंकण्यासाठी आले आहेत. अगदी मी स्वतः पण बिग बॉस 16 ची ट्रॉफी जिंकण्यासाठीच आलो आहे. यामुळे मी स्पर्धा मध्येच सोडणार नाही. पण माझ्यानंतर ही स्पर्धा जिंकण्यासाठी लायक कोण असा प्रश्न जर असेल तर त्याचे उत्तर एमसी स्टॅन हेच आहे. मला मिळणार नसल्यास स्टॅनने बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी असे शिव ठाकरे म्हणाला.
हिंदी बिग बॉस 16च्या टॅाप-5 मध्ये प्रियंका चौधरी, एमसी स्टॅन, शिव ठाकरे, अर्चना गौतम आणि शालीन भनोत हे आहेत. सध्या तरी ट्रॅाफीसाठी तीन सदस्यांमध्ये मोठी कॉम्पिटीशन बघायला मिळत आहे. प्रियंका चौधरी, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांना जिंकवण्यासाठी त्यांचे चाहते प्रयत्न करत आहेत.