KBC १२ : केबीसीच्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन घेतात 'इतकी' फी

मालिका-ए-रोज
Updated Nov 21, 2020 | 11:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

सुपरस्टार अमिताभ बच्चन आजकाल कौन बनेगा करोडपती सीझन १२ होस्ट करीत आहेत. अमिताभ बच्चन यांनी फक्त सीझन ३ वगळता प्रत्येक मोसमात हा कार्यक्रम होस्ट केला आहे.

Amitabh Bachchan
अमिताभ बच्चन  |  फोटो सौजन्य: Times of India

थोडं पण कामाचं

  • कौन बनेगा करोडपती हा शो एका प्रकारे अमिताभ बच्चन यांच्या नावाने ओळखला जातो
  • हा रिअ‍ॅलिटी शो २००० मध्ये सुरू झाला
  • केबीसी हा एक क्विझ रिअ‍ॅलिटी शो आहे

Amitabh Bachchan Fees for KBC 12 : सुपरस्टार अमिताभ बच्चन आजकाल कौन बनेगा करोडपती सीझन १२ होस्ट करीत आहेत. अमिताभ बच्चन यांनी फक्त सीझन ३ वगळता प्रत्येक मोसमात हा कार्यक्रम होस्ट केला आहे. हा शो एका प्रकारे अमिताभ बच्चन यांच्या नावाने ओळखला जातो आणि त्यांच्या जागी इतर कोणालाही पाहायला चाहत्यांना आवडत नाही. अगणित लोकं या कार्यक्रमात फक्त अमिताभ बच्चन यांना भेटायला मिळेल म्हणून सहभागी होतात. पण या शोच्या एका एपिसोडसाठी अमिताभ बच्चन यांना किती पैसे मिळतात हे तुम्हाला माहितेय का? 

हा रिअ‍ॅलिटी शो २००० मध्ये सुरू झाला, ज्याची लोकप्रियता अद्याप अबाधित आहे. सपर्धाकांचे खिसे भरणाऱ्या या शोमध्ये अमिताभ बच्चन यांनीसुद्धा बरीच कमाई केली आहे. केबीसी १२ साठी अमिताभ बच्चन प्रति एपिसोड ३-५ कोटी रुपये घेतात असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार केबीसी सीझन १२ साठी अमिताभ बच्चन २५० कोटी रुपयांपर्यंत मानधन घेऊ शकतात. गेल्या हंगामात त्यांनी एका एपिसोडसाठी २ कोटी रुपये घेतले, परंतु यावेळी त्याची फी वाढली आहे. तथापि टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.

केबीसी हा एक क्विझ रिअ‍ॅलिटी शो आहे. या शोचा सीझन १ व २ अमिताभ बच्चन यांनी होस्ट केला होता. त्यानंतर सीझन 3 शाहरुख खानने होस्ट केला होता. नंतर परत सीझन ४ ते १२ अमिताभ यांच्याकडे आले. हा स्वप्नपूर्ती करणारा कार्यक्रम खूप लोकप्रिय आहे आणि तो टीआरपीच्या यादीमध्ये टॉप आहे. 

अलीकडेच २ करोडपती मिळाले 

केबीसीच्या १२ व्या मोसमात नुकतेच दोन जणं करोडपती झाले. रांचीच्या रहिवासी नाझिया नसीम प्रथम करोडपती ठरल्या. सध्या त्या रॉयल एनफील्ड, गुडगाव येथे ग्रुप मॅनेजर इंटर्नल कम्युनिकेशन पदावर कार्यरत आहेत. मोहिता शर्मा हंगामातील दुसरी करोडपती ठरल्या. मोहिता हिमाचल प्रदेशच्या असून त्या जम्मू-काश्मीर पोलीस विभागात कार्यरत आहेत. त्या आयपीएस आहेत. मोहिता यांनी हा खेळ उत्तम पद्धतीने खेळला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी