ही नवी टीव्ही मालिका सुरु होताच होणार ‘हे’ मोठे बदल

मालिका-ए-रोज
Updated Oct 07, 2019 | 16:58 IST | चित्राली चोगले

झी मराठी वाहिनीवर सध्या एका नवीन मालिकेचा प्रोमो जारदार सुरु आहे. हा प्रोमो सुरु होताच अनेकांना वाटलेलं की कुठली तरी मालिका बंद होणार आहे. आम्ही आधीच सांगीतल्याप्रमाणे तसं काहीही होणार नाहीये पण वेळ बदलणार.

zee Marathi shows to change timing after new show lagnachi wife weddingchi baiku begins
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होताच मनारंजनाच्या वेळेत होणार ‘हे’ मोठे बदल  |  फोटो सौजन्य: Instagram

थोडं पण कामाचं

  • झी मराठीवर नवीन मालिका सुरु होताच होणार मोठे बदल
  • २१ ऑक्टोबरपासून होम मिनिस्टर आणि तुझ्यात जीव रंगलाची वेळ बदलणार
  • लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू येत्या २१ ऑक्टोबरपासून संध्या ७.३० वा. रंगणार

मुंबई: झी मराठी वाहिनीवर नुकतीच एक नवीन मालिका 'लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू' जाहीर झाली. या नव्या मालिकेचे प्रोमो देखील एकदम जोरदार सुरु झाले आहेत. मालिका २१ ऑक्टोबर २०१९ पासून दररोज संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार हे देखील जाहीर झालं. त्यानंतर मात्र एकच चर्चा रंगली. ही वेळ सध्या नंबर वन वर असलेल्या राणा दा आणि अंजली बाई म्हणजेच सगळ्यांच्या लाडक्या 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेची आहे. मग ही मालिका बंद होणार का? असा प्रेश्न देखील निर्माण झाला आणि यावर बरीच चर्चा झाली. पण ही मालिका अजिबात बंद होणार नाहीए. चला पाहुयात ही मालिका सुरु होताच काय होणार आहेत बदल.

तर आम्ही सांगितल्याप्रमाणेच झालं आहे आणि झी मराठीवर २१ ऑक्टोबरपासून नवीन मालिका सुरु होईल पण कोणतीही मालिका रजा घेणार नाही. झी मराठीवरील दोन मालिकांची वेळ मात्र बदलणार आहे. हा मनोरंजन विश्वातील मोठा बदल असेल हे नक्की. प्राईम टाईम म्हणजे जवळपास ६नंतर ते रात्री ९पर्यंत टेलिव्हिजन दुनियेसाठी खूप महत्त्वाचा वेळ असतो. या वेळेत झी मराठीवर देखील त्यांच्या टीआरपीच्या यादीत पहिल्या ५ स्थानावर असलेल्या मालिका चालतात. त्यातल्या दोन अतिशय लोकप्रिय असलेल्या होम मिनिस्टर आणि तुझ्यात जीव रंगला च्या वेळेत आता बदल होणार आहे.

 

 

होम मिनीस्टर गेले १३ वर्षांच्या वर सुरु आहे. इतके वर्ष एकच वेळ म्हणजे संध्या. ६.३० वाजता हा शो सुरु आहे पण आता मात्र तो संध्या. ६ वाजता दिसणार आहे. तसंच टीआरपीमध्ये अनेकदा नंबर १ वर असलेली मालिका तुझ्यात जीव रंगला आता संध्या. ७.३० वा. च्या ऐवजी संध्या ६.३० वा. दिसणार आहे. दोन्ही मालिकांची प्रचंड लोकप्रियता बघता हा खूप मोठा निर्णय आहे. तसंच या बदलामुळे या मालिकांच्या टीआरपीमध्ये काही बदल होतात का ते पण पाहावं लागेल.

 

 

नवीन मालिका लग्नाची वाईफ वेडिंगची बायकूला मात्र या वेळेचा खूप फायदा होणार आहे. एकतर प्राईम टाइम त्यात ही एक असा स्लॉट ज्याला आधीच प्रचंड लोकप्रियता आहे. त्यात इतर प्रतिस्पर्धी चॅनलकडे असलेल्या मालिका देखील तितक्या लाईमलाईटमध्ये नाहीत. त्यामुळे या नवीन स्लॉटचा किती फायदा या नवीन मालिकेला होतो आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळवण्यात ही नवीन मालिका यशस्वी होते का? ते येत्या काही दिवसात स्पष्ट होईलंच. तर मग येत्या २१ ऑक्टोबरपासून संध्या. ७.३० वा. ही नवीन मालिका लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू अनुभवण्यासाठी सज्ज होऊयात. या व्यतिरिक्त झी मराठी वर सुरु असलेल्या इतर मालिका आहे त्याच वेळेत सुरु राहणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी