'जीव झाला येडापिसा' या मालिकेतील 'सिद्धी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री विदुला चौगुले हिने नुकतंच एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे. तिचे हेच फोटो आता व्हायरल देखील होत आहेत.
'जीव झाला येडापिसा' या मालिकेतील 'सिद्धी'ची भूमिका साकारणारी अभिनेत्री विदुला चौगुले हिने नुकतंच एक जबरदस्त फोटोशूट केलं आहे. तिचे हेच फोटो आता व्हायरल देखील होत आहेत.
अभिनेत्री विदुला ही सोशल मीडियावर आता चांगलीच अॅक्टिव्ह झाली असून तिच्या नवनव्या फोटोना देखील चाहते पसंत करत आहेत.
विदुलाने नुकतेच काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती एका ब्लॅक कलरच्या वन पीसमध्ये पाहायला मिळत आहे. तिच्या लूकला तिचे चाहते देखील पसंत करत आहेत.
सिद्धीची भूमिका साकारणारी विदुला ही सुरुवातीला सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह नव्हती. पण आता विदुलाने या मीडियाचं महत्त्व ओळखलं असून ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच तिचे नवनवे फोटो शेअर करत असते.
विदुलाचे इंस्टाग्रामवर जवळजवळ दीड लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. त्यामुळे तिच्या फोटोंना देखील आता बऱ्याच प्रमाणात लाइक्स मिळत आहेत.
काही दिवसांपूर्वीच विदुलाने असेच बोल्ड फोटो शेअर केले होते. ज्याला हजारो अधिक लाईक्स मिळाले होते. त्यामुळे आता दिवसेंदिवस विदुलाची लोकप्रियता वाढत जात असल्याचं पाहायला मिळत आहे.