VIDEO: नागिन मालिकेतील अभिनेत्रीचा स्टंट सोशल मीडियावर व्हायरल 

Naagin 5 Video: अभिनेत्री सुरभि चंदना हिचा नागिन ५ मालिकेतील एक स्टंटचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. पाहा हा व्हिडिओ.

surabhi chandna
VIDEO: नागिन मालिकेतील अभिनेत्रीचा स्टंट सोशल मीडियावर Viral  |  फोटो सौजन्य: Instagram

मुंबई: टीव्ही स्टार नागिन 5 (Naagin 5) मध्ये अभिनेत्री सुरभि चंदना (Surbhi Chandna) पुन्हा एकदा तिच्या स्टंटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सुरभि नागिन 5 मध्ये दिसणार आहे. सुरभी चंदनाने सोशल मीडियावर नागीन-5 च्या सेटवरून शूट दरम्यानचा एक स्टंट व्हिडिओ (Video) शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सुरभी चंदना निळ्या आणि लाल रंगाच्या गेटअपमध्ये हवेत उंच लटकून कॅमेरासमोर स्टंट करत असल्याचं दिसून येत आहे. सुरभीने तिच्या स्टंटने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

सुरभि चंदना तिच्या नागीन शोच्या सेटअपवर एक अतिशय खतरनाक स्टंट करताना दिसत आहे. हा स्टंट पाहून तुम्हालाही देखील भीती वाटेल बसेल. दिवाळीच्या दुसर्‍याच दिवशी सुरभिने नागिन-5 चे शूटिंग सुरू केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी