अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने असं केलं करण कुंद्राच्या फॅमिलीला इम्प्रेस

Actress Tejasswi Prakash and Karan Kundrra: अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे टीव्ही क्षेत्रातील सर्वात चर्चित कपल आहेत. तेजस्वी प्रकाशने सांगितलं आहे की तिने कशाप्रकारे करण कुंद्राच्या कुटुंबियांना इम्प्रेस केलं. 

Actress Tejasswi prakash explain how she welcom by karan kundra family watch video
अभिनेत्री तेजस्वी प्रकाशने असं केलं करण कुंद्राच्या फॅमिलीला इम्प्रेस 

मुंबई : करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश बिग बॉस १५ नंतर सर्वात चर्चित कपल बनले आहेत. दोघांनीही आपल्या लव लाईफ बाबत खुलेपणाने जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर दोघेही एकमेकांना आपल्या प्रेमाबाबतची कबुली उघडपणे सुद्धा देत आहेत. दोघेही नुकतेच एका पावसाच्या म्युझिक व्हिडिओत एकत्र दिसून आले होते.

Telly Talk India सोबत बोलताना तेजस्वी प्रकाशने म्हटलं, "यांचे कुटुंब इतकं स्वागत करणार आहे आणि इतकं प्रेम करणारं कुटुंब आहे, मला तर जास्त काही करण्याची गरजच पडणार नाही की ज्यामुळे ते इम्रेस होतील. ते खरंच खूप रिअल लोक आहेत आणि त्यांना तशीच माणसे सुद्धा आवडतात. त्यामुळे मी जशी आहे तशीच राहते आणि त्यांना मी आवडली."

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी