Kahaani Ghar Ghar Kii To Return On TV After 14 Years: साक्षी तन्वरच्या कारकिर्दीवर ठसा उमटवणारा 'कहानी घर घर की' हा टीव्ही शो १४ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत आहे. जेव्हा हा टीव्ही शो ऑन एअर झाला तेव्हा प्रेक्षक तो पाहण्यासाठी उत्सुक होते. हा टीव्ही शो एकता कपूरच्या लोकप्रिय टीव्ही शोपैकी एक आहे.
अलीकडेच, सुप्रसिद्ध निर्माती एकता कपूरने आपल्या सोशल हँडलवर शोचा एक व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की, ही मालिका 14 वर्षांनंतर टीव्हीवर परत येत आहे. 2 ऑगस्टपासून हा टीव्ही शो पुन्हा एकदा ऑन एअर होणार असल्याचेही तिने सांगितले. सोमवार ते रविवार दुपारी साडेतीन वाजता प्रेक्षकांना तो टीव्हीवर पाहता येणार आहे.