रणवीर सिंह नंतर आता टीव्ही अभिनेता करण वीर मेहराने शेअर केलं न्यूड फोटोशूट

Nude photoshoot of actor: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्यानंतर आणखी एका अभिनेत्याने न्यूड फोटोशूट केलं आहे. टीव्ही अभिनेता करण वीर मेहरा याने आपलं न्यूड फोटोशूट सोशल मीडियात शेअर केलं आहे.

after Ranveer singh now tv actor karan veer mehra shared his nude photoshoot watch video
रणवीर सिंह नंतर आता 'या' अभिनेत्याने केलं न्यूड फोटोशूट  

Actor Karan Veer Mehra nude photoshoot: बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याच्या फोटोशूटची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेता रणवीर सिंह याच्या फोटोशूट नंतर काहींनी याचं कौतुक केलं होतं तर काहींनी मीम्स बनवत ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. रणवीर सिंह याच्या फोटोशूटची चर्चा सुरू असतानाच आता टीव्ही अभिनेता करण वीर मेहरा (TV actor Karan Veer Mehra) याचं फोटोशूट समोर आलं आहे. (after Ranveer singh now tv actor karan veer mehra shared his nude photoshoot watch video)

अभिनेता करण वीर मेहरा याने आपलं न्यूड फोटोशूट सोशल मीडियात शेअर केलं आहे. होय... रणवीर सिंहपासून प्रेरित होत करण वीर सिंह याने आपलं न्यूड फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. त्याने आपल्या फोटोचा आणि रणवीरच्या फोटोचा एक कोलाजही बनवला आहे. करण याने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "#रणवीरपासून प्रेरित, २०१५ मध्ये शूट केलं होतं पण रणवीर सिंह याच्यामुळे पोस्ट करण्याची हिंमत मिळाली".

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी