Anupamaa TV Serial : रुपाली गांगुली आणि गौरव खन्ना यांच्या अनुपमा या टीव्ही शोमध्ये आता एक नवीन ट्विस्ट येणार आहे. या मालिकेत अनुपमा ही शाह हाऊसमधून कायमची निघून जाणार असल्याचे पाहायला मिळणार आहे.
जाण्यापूर्वी ती शाह कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी बोलणार आहे. यावेळी ती म्हणेल की त्या या घरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही. यानंतर किंजलने विचारले की, ती राखीसाठी देखील येणार नाही का? अनुपमा म्हणाली की ती कोणत्याही सणासुदीला शाह हाऊसमध्ये येणार नाही. अशा परिस्थितीत अनुपमा आता पुढे काय करते हे येत्या एपिसोडमध्येच कळेल.