Bhagya dile tu mala : वैदेहीचे बिंग आज फुटणार, तिचे कपट कारस्थान येणार कावेरीसमोर

मालिका-ए-रोज
Updated Dec 15, 2022 | 13:43 IST

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका भाग्य दिले तू मलामध्ये आज मोठा गौप्यस्फोट होणार आहे. मालिकेत मैत्रिण म्हणविणारी वैदेहीने कावेरीसोबत कसे कट कारस्थान केले आहे याचा खुलासा आज होणार आहे.

 मुंबई :  कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका भाग्य दिले तू मलामध्ये आज मोठा गौप्यस्फोट होणार आहे. मालिकेत मैत्रिण म्हणविणारी वैदेहीने कावेरीसोबत कसे कट कारस्थान केले आहे याचा खुलासा आज होणार आहे. ( Bhagya Dile Tu Mala Today Promo 15 december Episode 208 Colors Marathi read in marathi)
 
 आज राजवर्धन लग्नाचे विधी सुरू असताना कावेरीला बोलावून घेतो आणि ती विचारते तुम्हांला काय हवं आहे का. त्यावर राजवर्धन म्हणतो मला तर तुम्हीच हव्या होत्या. मी तुम्हांला सांगितलं होतं की, माझं लग्न तुमच्यासमोर होईल. मी एकदाच लग्न करणार आहे. त्यामुळे तुम्ही इथेच बसा. तेव्हा रत्नमाला मोहिते येतात. त्या कावेरीला म्हणतात, की मला माझ्या मुलाच्या लग्नाचा आनंद नाही तर तुझी काळजी जास्त वाटते आहे.  त्यानंतर राजवर्धन कावेरीला म्हणतो, काकू माझे लग्न कसे वाटते आहे. त्यावर कावेरी तिथून निघून जाते. मग रत्नमाला मोहिते राजवर्धनला म्हणतात, की हा प्रश्न तिला विचारतोय तो स्वतःला विचार. 
 
 दुसरीकडे वैदेहीच्या ऑफिसमधील दोन मुली चर्चा करत असताना कावेरी त्यांचे बोलणे ऐकते. वैदेही मॅमने काय भन्नाट प्लान केला. अॅक्सिडेंटचे खोटं नाटक केले आणि आत्महत्येचेही खोटं नाटक केले. विषामध्ये पाणी मिक्स केले होते. हे ऐकल्यावर कावेरीच्या पायाखालची जमीन सरकते. ती तातडीने घरी जाते आणि तिने राजवर्धनला पाठवलेले पत्र पाहते. त्यावेळी तिला समजते की वैदेहीने राजवर्धनला तिचे प्रेमाच्या कबुलीचे पत्र दिलेच नाही. 
 
 
मग पुढे काय होते ते पाहा आजच्या भागात 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी