Bhagya Dile Tu Mala :  कावेरीच्या वडिलांनी राजवर्धनला टाकली मोठी अट, करू शकेल का पूर्ण पाहा आज का होणार 

मालिका-ए-रोज
Updated Dec 20, 2022 | 12:56 IST

कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'भाग्य दिले तू मला' मध्ये सर्व सुरळीत होणार असे वाटत असताना कावेरीच्या वडिलांना मिठाचा खडा टाकला आहे. त्यांनी राजवर्धन मोहितेला कावेरीशी लग्न करण्यासाठी एक मोठी अट टाकली आहे. ती राजवर्धन मान्य करणार का हे आता पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

थोडं पण कामाचं
  • कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'भाग्य दिले तू मला' मध्ये सर्व सुरळीत होणार असे वाटत असताना कावेरीच्या वडिलांना मिठाचा खडा टाकला आहे.
  • त्यांनी राजवर्धन मोहितेला कावेरीशी लग्न करण्यासाठी एक मोठी अट टाकली आहे.
  • ती राजवर्धन मान्य करणार का हे आता पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मुंबई :  कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका 'भाग्य दिले तू मला' मध्ये सर्व सुरळीत होणार असे वाटत असताना कावेरीच्या वडिलांना मिठाचा खडा टाकला आहे. त्यांनी राजवर्धन मोहितेला कावेरीशी लग्न करण्यासाठी एक मोठी अट टाकली आहे. ती राजवर्धन मान्य करणार का हे आता पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Bhagya Dile Tu Mala Today Promo  Episode 211 Colors Marathi read in marathi)

अधिक वाचा : या टिप्सने बनेल पुरी कुरकुरीत

कालच्या भागात कावेरीने राजवर्धनला प्रेमाची कबुली दिली त्यानंतर कावेरीचे वडील तिला लग्न मंडपातून घेऊन गेले. आता कावेरीचा हात मागण्यासाठी राजवर्धन आणि रत्नमाला मोहिते कावेरीच्या गावी येतात. पण कावेरीचे वडील या लग्नाला तयार नाही. ते राजवर्धनला एक अट टाकतात.  रत्नमाला मोहिते यांचा पैसा आणि नाव बाजूला ठेवून या गावात राहून दाखवा. तरच मी मुलीचे लग्न तुमच्याशी लावून देईल. यावर राजवर्धन काय बोलणार हे आजच्या भागात पाहायला मिळेल. 

अधिक वाचा : या कारणांमुळे तुमचे वजन कमी होत नाही

दुसरीकडे वैदैही आपल्या आई वडिलांना घरातून जाण्यास सांगते. ती म्हणते माझे भले करून झाले असेल तर आता निघा. यापुढे मी गावाला येणार नाही किंवा तुमची मुलगी जिंवत आहे का मेली हे सुद्धा पाहायला येऊ नका. वैदेहीची आई रडू लागते आणि वडिलांना धक्का बसतो. 

पाहा काय होणार आजच्या भागात 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी