Bigg Boss 13: बिग बॉस १३ स्पर्धक हिना खानने 'याला' सुनावलं!

मालिका-ए-रोज
Updated Jan 12, 2020 | 14:58 IST

Bigg Boss 13: बिग बॉसची एक्स कंटेस्टेंट हिना खानने सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांच्या नात्याबाबत भाष्य केलं आहे.

मुंबई: टीवी रिएलिटी शो बिग बॉस १३ ला आता  १०० हून अधिक दिवस झाले आहेत. आतापर्यंत या घरात अनेक वाद झाले आहेत. जे प्रेक्षकांनी देखील पाहिले आहेत. घरात सुरु असणाऱ्या वादावर नेहमीच सेलिब्रिटीच्या रिअॅक्शन आपल्याला पाहायला मिळतात. आता यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉसची एक्स कंटेस्टेंट हिना खान हिने आपलं मत मांडलं आहे. टेली टॉकशी बातचीत करताना तिने सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल याच्यातील ट्विटर वॉरबाबत भाष्य केलं आहे.  

हिना असं म्हणाली की, घरात सगळेजण चांगलं काम करत आहे. तसंच आपल्याला एंटरटेन देखील करत आहेत. त्यामुळे आता त्यांना कुणीही जज करण्याची गरज नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी