Bhagya Dile Tu Mala : भाग्य दिले तू मला'मध्ये बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी

मालिका-ए-रोज
Updated Aug 29, 2022 | 19:12 IST

Bhagya Dile Tu Mala : कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' (bhagya dile tu mala) ही मालिका चांगलीच गाजते आहे. या मालिकेनं कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.

थोडं पण कामाचं
  • कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' (bhagya dile tu mala) ही मालिका चांगलीच गाजते आहे.
  • या मालिकेनं कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
  •  सध्या मराठी मालिकाविश्वात  काकू - बोक्याच्या जोडीला  प्रचंड लोकप्रियता मिळत  आहे.

Bhagya dile tu mala Ganesh Chaturthi episode, मुंबई: कलर्स मराठीवरील 'भाग्य दिले तू मला' (bhagya dile tu mala) ही मालिका चांगलीच गाजते आहे. या मालिकेनं कमी कालावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.  सध्या मराठी मालिकाविश्वात  काकू - बोक्याच्या जोडीला  प्रचंड लोकप्रियता मिळत  आहे. आता या मालिकेत सध्या लाडक्या गणू बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे.  (Ganpati Festival preparation in colors marathi serial Bhagya Dile Tu Mala)

अधिक वाचा : नागराज मंजुळेंनी आधी केलीय सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी

मालिकेत गणू बाप्पाच्या आगमनाची चांगलीच जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी कावेरी इतर सर्व कुटुंबीय गणू बाप्पाच्या मखराच्या सजावटीची तयारी करताना दिसत आहे.  कावेरीनं गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. त्यावर जांभळ्या रंगाचे ब्लाऊज परिधान केले आहे. तर राजवर्धन याने निळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. 

अधिक वाचा : पडद्यावरील 'अंगुरी भाभी' रिअल लाईफमध्ये अजूनही आहे सिंगल, जाणून घ्या का

राजवर्धन हा डेकोरेशन करत असतो त्यावेळी गायत्री त्याला फुलांची सजावट कशी करायची याच्या काही सूचना करत असते. त्यात त्यांचा नेहमीसारखा प्रेमळ वाद होतो. हा वाद प्रेक्षकांना पाहायला नेहमी आवडतो.  तसाच गायत्री म्हणते तुम्हांला रंगामधलं काही कळत नाही. त्यावर राजवर्धन म्हणतो की माझं घर आहे, माझा बाप्पा आहे. मी ठरवणारा डेकोरेशन करसं करायचं  आतापर्यंत मीच करत आलो आहे. त्यावर गायत्री म्हणते असं काही नसतं माझा बाप्पा तुमचा बाप्पा... बाप्पा हा सर्वांचा असतो. 

अधिक वाचा : पैशाने या मौल्यवान वस्तू विकत घेता येत नाही

हे सुरू असताना राजवर्धनची आई हा वाद ऐकत असते असा सीन चित्रित केला जात आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी