ये रिश्ता क्या कहलाता है... कोणावर कोसळला दु:खाचा डोंगर?

Yeh Rishta Kya Kehlata Hai latest Spoiler: बिर्ला कुटुंब खूप दुःखातून जात आहे. अनिशाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने गोयंका हाऊसमध्ये सुरू असलेल्या लग्नकार्यावर शोककळा पसरली आहे.

ये रिश्ता क्या कहलाता है... कोणावर कोसळला दु:खाचा डोंगर?
ये रिश्ता क्या कहलाता है... कोणावर कोसळला दु:खाचा डोंगर? 

Yeh Rishta Kya Kehlata Hai latest Spoiler: 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये अक्षराचा भाऊ कायरवच्या लग्नातील सर्व आनंद उध्वस्त झाला आहे. आपल्याला माहित आहे की बिर्ला कुटुंब एका खोल दुःखातून जात आहे. अनिशाचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळे गोयंका हाऊसमध्ये सुरू असलेल्या विवाह सोहळ्याचे शोकसागरात रुपांतर झाले आहे. दुसरीकडे, बिर्ला कुटुंबातील अभिमन्यू आपली बहीण गमावल्यानंतर खूप दुःखी दिसत आहे. 

आता नव्या एपिसोडमध्ये अक्षराच्या विरोधात बिर्ला फॅमिली दिसणार आहे, एवढेच नाही तर कायरवला या सगळ्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. अनिशाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बिर्ला कुटुंब अक्षराला घेऊन जाईल. 'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्येही जेल ट्रॅक दिसणार आहे. कारण आता कायरवला अनिशाच्या मृत्यूला जबाबदार धरून तुरुंगात पाठवले जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी