[VIDEO] 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत आलं नवं वळण

मालिका-ए-रोज
Updated Mar 18, 2020 | 17:58 IST

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत नवं वळण आलेलं आहे. पाहा कार्तिक आणि नायरा यांना नेमकं काय माहिती समजणार आहे. 

Yeh Rishta Kya Kehlata Hai: 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील 'कायरा' म्हणजेच कार्तिक आणि  नायरा ही जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही मालिका प्रत्येक घरा-घरात पोहचली आहे. या मालिकेत आतापर्यंत अनेक टर्न आणि ट्विस्ट पाहायला मिळाले आहेत. अलीकडेच, कार्तिक आणि नायरा दुखण्याने त्रस्त असलेल्या गायूच्या मदतीसाठी पोहचले आहे, गायू त्यांना सांगते की, ती गर्भवती आहे. त्याचबरोबर ती ही गोष्ट कुटुंबीयांपासून लपवण्यास सांगते. कार्तिक आणि नायरा गायूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. कायरा गायूला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना, तिला  कर्करोग झालेल्या एका नर्सविषयी समजतं. ही तीच नर्स आहे जी कार्तिक आणि नायराच्या पहिल्या बाळाबद्दल सांगते. ती सांगते की, त्यांची मुलगी मरण पावली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी