VIDEO: शिवांगी जोशी शीतयुद्ध संपवून 'हिच्या'सोबत खरेदीसाठी पडली बाहेर

Jannat Zubair and Shivangi Joshi step out together: असे म्हटले जाते की शिवांगी जोशी आणि जन्नत जुबेर रहमानी यांच्यात बरेच दिवस शीतयुद्ध सुरू होते. आता दोघांनीही वैर विसरून पुन्हा एकदा हातमिळवणी केली आहे.

jannat zubair and shivangi joshi arrived together for shopping joined hands to end cold war
VIDEO: शिवांगी जोशी शीतयुद्ध संपवून 'हिच्या'सोबत खरेदीसाठी पडली बाहेर  |  फोटो सौजन्य: Instagram

Jannat Zubair and Shivangi Joshi: अभिनेत्री जन्नत जुबेर आणि शिवांगी जोशी त्यांच्या मैत्रीमुळे खूप चर्चेत आहेत. खतरों के खिलाडी 12 हा रिअॅलिटी शो संपल्यानंतरही टीव्हीवरील दोन लोकप्रिय चेहऱ्यांमध्ये छान मैत्री झाली आहे. आता नुकतेच दोन्ही अभिनेत्री एकत्र शॉपिंग करताना दिसल्या. या शॉपिंग आऊट डेचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (jannat zubair and shivangi joshi arrived together for shopping joined hands to end cold war) 

शिवांगी जोशी आणि जन्नत जुबेर रहमानी यांच्यात बरेच दिवस शीतयुद्ध सुरू होते. आता दोघांनीही वैर विसरून पुन्हा एकदा हातमिळवणी केली आहे. याबाबत शिवांगी म्हणाली होती की, 'एक काळ असा होता की मी जन्नत जुबेर रहमानीशी बोलले नाही. आम्हा दोघांना एकमेकांवर रागावण्याचे कारण कळत नव्हते. आमच्यात अजिबात संभाषण झाले नाही हे खरे आहे. आमच्या दोघींमध्ये काही गैरसमज होते, ते दूर झाले आहेत. काही वेळाने मला कळले की जन्नत चांगली मुलगी आहे. आता आमच्यात मैत्री आहे आणि लोक आम्हाला सीता आणि गीता या नावाने हाक मारतात.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी